10 April 2020

News Flash

निर्देशांकांच्या सलग दोन सत्रांतील घसरणीला खंड

आघाडीच्या समभागांकरिता गुंतवणूकदारांनी नोंदविलेल्या मागणीमुळे येथील भांडवली बाजारातील गेल्या सलग दोन व्यवहारांतील घसरणही थांबली.

मुंबई : करोना विषाणू प्रसाराचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मर्यादित परिणाम होण्याबाबत दिसून आलेल्या शक्यतेने भांडवली बाजारात मंगळवारी पुन्हा गुंतवणूकओघ दिसून आला. आघाडीच्या समभागांकरिता गुंतवणूकदारांनी नोंदविलेल्या मागणीमुळे येथील भांडवली बाजारातील गेल्या सलग दोन व्यवहारांतील घसरणही थांबली.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आठवडय़ाच्या दुसऱ्या व्यवहारात २३६.५२ अंश वाढीने ४१,२१६.१४ वर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७६.४० अंश वाढीमुळे १२,१०७.९० पर्यंत पोहोचला. दोन्ही प्रमुख निर्देशांकात सप्ताहारंभीच्या तुलनेत प्रत्येकी अर्ध्या टक्क्याहून अधिक वाढ नोंदली गेली.

मुंबई निर्देशांकातील रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी लिमिटेड, एनटीपीसी, मारुती सुझुकी, स्टेट बँक, पॉवरग्रिड, बजाज ऑटो, अल्ट्राटेक सिमेंट, अ‍ॅक्सिस बँक आदी ३ टक्क्यांपर्यंत वाढले. तर भारती एअरटेल, महिंद्र अँड महिंद्र, नेस्ले इंडिया, टीसीएस, सन फार्मा आदी पाऊण टक्क्यापर्यंत घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बहुपयोगी वस्तू, ऊर्जा, पोलाद, बँक, आरोग्यनिगा, ग्राहकोपयोगी वस्तू आदी १.६८ टक्क्यांपर्यंत वाढले. तर दूरसंचार निर्देशांकाला काही प्रमाणात घसरणफटका बसला. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप ०.३५ टक्क्याने वाढला. तर स्मॉल कॅप ०.१८ टक्क्याने घसरला.

करोना विषाणूंचे मूळ असलेल्या चीनमधील नव्या वर्षांच्या सुटीचा विस्तारित कालावधी संपुष्टात आल्याने आर्थिक हालचालींना गती मिळण्याची आशा मंगळवारी आशियाच्या बाजारात उमटली. त्याचाच कित्ता गिरवत गुंतवणूकदारांनी येथेही सकाळच्या व्यवहारापासूनच खरेदीसत्र आरंभले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2020 12:38 am

Web Title: corona virus transmission has limited impact on the global economy index fell in two consecutive sessions akp 94
Next Stories
1 वर्षांरंभीही वाहन विक्रीत घसरणच; जानेवारी २०२० मध्ये ६.२ टक्के घट
2 सप्ताहारंभीही घसरण
3 म्युच्युअल फंड गंगाजळी ऐतिहासिक टप्प्यावर
Just Now!
X