तिमाहीत घराण्यांच्या गुंतवणूक निधीत घसरण

मुंबई : करोना आणि टाळेबंदीसारख्या संकट कालावधीत गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांकडे पाठ वळविली आहे. विशेषत: समभाग आणि रोखे प्रकारच्या गुंतवणुकीतील निधी निर्गमनामुळे गेल्या तिमाहीत एकू ण म्युच्युअल फं ड गंगाजळी ८ टक्क्याने रोडावून २५ लाख कोटी रुपयांच्या आत विसावली आहे.

देशातील विविध ४५ फं ड घराण्यांची मालमत्ता एप्रिल ते जून २०२० या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत ८ टक्क्यांनी घसरून २४.८२ लाख कोटी रुपयांवर येऊन ठेपली आहे.

वर्षभरापूर्वीच्या याच कालावधी दरम्यान एकू ण म्युच्युअल फं ड मालमत्ता २५.५० लाख कोटी रुपये होती, तर आधीच्या तिमाहीत ती विक्रमी अशी २७ लाख कोटी रुपये होती.

गेल्या तिमाहीत देशातील भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक दुहेरी अंकापर्यंत झेपावले. मात्र करोना विषाणूचा प्रसार त्यामुळे होणारी हानी तसेच परिणामी विस्तारलेल्या टाळेबंदीमुळे फं ड गुंतवणूकदारांनी आर्थिक अस्थिरतेपोटी या दरम्यान फं ड गुंतवणुकीकडे दुर्लक्ष दिसत असल्याचे फं ड उद्योगाची संघटना – अ‍ॅम्फीच्या ताज्या आकडेवारीवरून दिसत आहे. याउलट फं ड गुंतवणूक पर्यायातील निधी काढून घेण्याकडे कल राहिल्याचे स्पष्ट होत आहे.

एकूण फं ड गंगाजळीबाबत ३.६४ लाख कोटी रुपयांसह एसबीआय म्युच्युअल फंड अव्वल राहिली आहे. तसेच एचडीएफसी, आयसीआयसीआय प्रूडेन्शिअल, आदित्य बिर्ला सन लाइफ आणि निप्पॉन इंडिया हे पहिल्या पाचमध्ये राहिले आहेत.