News Flash

कॉसमॉस बँकेकडून कर्जावरील व्याजदरात अर्धा टक्क्य़ांपर्यंत कपात

कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेने आपल्या विविध कर्ज योजनांच्या व्याजदरात पाव ते अध्र्या टक्क्य़ांनी कपात जाहीर केली आहे. हे नवीन व्याजदर १५ फेब्रुवारी २०१५ पासून लागू होत

| February 14, 2015 01:33 am

कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेने आपल्या विविध कर्ज योजनांच्या व्याजदरात पाव ते अध्र्या टक्क्य़ांनी कपात जाहीर केली आहे. हे नवीन व्याजदर १५ फेब्रुवारी २०१५ पासून लागू होत आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेने अलीकडेच वैधानिक तरलता प्रमाणात (एसएलआर) अर्धा टक्क्य़ांची कपात केल्याने, बँकेच्या हाती अधिक पैसा आला आहे. त्याचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाने कॅश क्रेडिट, बिल्स डिस्काऊंटिंग, कृषी व कृषी संबंधित कर्ज योजना व अन्य मुदत कर्जावरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2015 1:33 am

Web Title: cosmos bank cuts interest rates
टॅग : Interest Rates
Next Stories
1 दिल्लीतील पराभव आर्थिक सुधारणापथाचा अडसर बनणार नाही : अर्थमंत्री
2 किरकोळ महागाई दराची ५ टक्क्य़ांपल्याड मजल
3 खाणकाम मरगळीची औद्योगिक उत्पादन दराला खणती!
Just Now!
X