30 March 2020

News Flash

सहाराला अमेरिकी न्यायालयाचा दिलासा; विदेशातील दोन हॉटेलच्या जप्तीला नकार

सहारा समूहाच्या मालकीच्या अमेरिकेतील दोन हॉटेलवर जप्ती आणण्याची मागणी येथील न्यायालयाने फेटाळून लावली आहे

सहारा समूहाच्या मालकीच्या अमेरिकेतील दोन हॉटेलवर जप्ती आणण्याची मागणी येथील न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सहारा समूहाच्या न्यूयॉर्क शहरातील प्लाझा व ड्रीम डाऊनटाऊन या दोन हॉटेल खरेदीच्या प्रयत्नातील कंपनीनेच याबाबतची मागणी केली होती.
संयुक्त अरब अमिरातस्थित ट्रिनिटी व्हाइट सिटी व्हेंचर्स, सहारा समूह व यूबीएस या स्वीस बँकेच्या विरोधात ३५ कोटी डॉलरचा दावा करताना हाँगकाँगस्थित जेटीएस ट्रेडिंगने या हॉटेलवर जप्ती आणण्याची मागणी एका याचिकेद्वारे अमेरिकेतील न्यायालयाकडे केली होती. न्यूयॉर्कच्या सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. सहारा समूहाने न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. जेटीएस ट्रेडिंगने आपण ट्रिनिटीचा भागीदार असल्याचा दावा करत सहाराचे तीन हॉटेल (अमेरिकेतील दोन व लंडनमधील एक) ताब्यात घेण्यासाठी यूबीएसकडून कर्ज उचलत असल्याची तयारी केली होती. मात्र १.५ अब्ज डॉलरच्या याबाबतच्या व्यवहारातून आपल्याला बाजूला करून ट्रिनिटीने सहाराशी थेट संधान साधल्याचा जेटीएस ट्रेडिंगचा आरोप केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2015 7:59 am

Web Title: court give relief to sahara
Next Stories
1 ‘फेड’कडून व्याजदरवाढ झाली तर?
2 निर्देशांकांची नजर‘फेड’!
3 १० लघु-वित्त बँकांना रिझव्र्ह बँकेची प्राथमिक मंजुरी
Just Now!
X