News Flash

स्टरलाइटचा तुतिकोरिन प्रकल्प बंद करण्यास न्यायालयाची मनाई

मिळनाडूतील तांबे वितळविण्याच्या प्रकल्पाद्वारे पर्यावरणाचे प्रदूषण केल्याबद्दल स्टरलाइट उद्योग समूहाला सर्वोच्च न्यायालयाने १०० कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला. तथापि, सदर प्रकल्प बंद करण्याचे आदेश

| April 3, 2013 02:35 am

मिळनाडूतील तांबे वितळविण्याच्या प्रकल्पाद्वारे पर्यावरणाचे प्रदूषण केल्याबद्दल स्टरलाइट उद्योग समूहाला सर्वोच्च न्यायालयाने १०० कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला. तथापि, सदर प्रकल्प बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले नाहीत.
स्टरलाइट उद्योग समूह हा ब्रिटनमधील वेदान्त समूहाची कंपनी आहे. न्या. ए. के. पटनायक यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने सदर निर्णय दिला. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या दूषित घटकांमुळे पर्यावरणाला बाधा निर्माण झाली असल्याने कंपनी नुकसानभरपाई देण्यास बांधील आहे, असे पीठाने म्हटले आहे.
नुकसानभरपाईची रक्कम कंपनीची आर्थिक स्थिती पाहून ठरविण्यात यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र प्रकल्प बंद करण्याचा आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आणि मद्रास उच्च न्यायालयाने २०१० मध्ये प्रकल्प बंद करण्याचा दिलेला आदेशही रद्दबातल ठरविला.
कंपनीवर नुकसानभरपाई लादताना न्यायालयाने म्हटले आहे की, १०० कोटी रुपयांपेक्षा कमी नुकसानभरपाईचे आदेश दिले असते तर त्याचा फारसा प्रभाव पडला नसता. नुकसानभरपाईची रक्कम पाच वर्षांत तुतीकोरीन जिल्हाधिकाऱ्यांकडे भरावयाची आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 2:35 am

Web Title: court opposed to closed the sterlite tuticorin project
टॅग : Court,Pollution
Next Stories
1 अभ्युदय बँकेची मुख्यमंत्री दुष्काळ निधीस मदत
2 ‘पेटंट लढय़ा’त नोव्हार्टिस तोंडघशी!
3 राष्ट्रीय शेअर बाजार प्रमुखपदी चित्रा रामकृष्णन
Just Now!
X