मुंबई : पंकजाकस्थुरी हर्बल रिसर्च फाऊंडेशनने तयार केलेल्या झिंगिविर-एच गोळ्यांच्या चिकित्सा चाचणीकरिता मान्यता मिळाली आहे. केरळस्थित आघाडीच्या आयुर्वेदिक संस्थेमार्फत कोविड-१९ बाधित वयस्क रुग्णांवर चिकित्सा चाचणीला ‘सीटीआरआय’ने मंजुरी दिली आहे. काही वैद्यकीय महाविद्यालयातील वयस्क रुग्णांना या गोळ्या दिल्या जाणार असून पैकी पहिले निष्कर्ष मेच्या दुसऱ्या आठवडय़ात येण्याबाबत आशा व्यक्त करण्यात आली आहे.

आयुर्वेदिक औषधनिर्मिती क्षेत्रात गेल्या तीन दशकांपासून असलेल्या  पंकजाकस्थुरी हर्बल रिसर्च फाऊंडेशनने तयार केलेल्या या गोळ्या तापावर परिणामकारक ठरू शकतात, असा दावा करण्यात आला आहे.

याबाबत राजीव गांधी जैवतंत्रज्ञान केंद्रातील अनुभवानंतर या गोळ्यांचा मानवी पेशींवर विपरित परिणाम होत नसल्याचे सिद्ध झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. ‘सीटीआरआय’ (क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडिया’च्या ‘आयईसी’ (इन्स्टिटय़ुशनल इथिक्स कमिटीज) ने याबाबतची मान्यता दिल्याचेही म्हटले आहे.