19 January 2021

News Flash

खनिज तेल ३० डॉलर खाली

२८ डॉलर प्रति पिंप हा ब्रेंट तेल दर हा आता २००३ च्या समकक्ष येऊन ठेपला आहे

आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही सलग सत्रांपासून घसरत असलेल्या खनिज तेल दराने सोमवारी प्रति पिंप ३० डॉलरच्याही खालचा प्रवास नोंदविला. २८ डॉलर प्रति पिंप हा ब्रेंट तेल दर हा आता २००३ च्या समकक्ष येऊन ठेपला आहे. तेल उत्पादक देश इराणवरील र्निबध हटविल्यानंतर या देशाला आता इंधन निर्यात करण्यास वाव मिळेल. या घटनेने आंतरराष्ट्रीय बाजारात तेल दरातील उतार लक्षणीय स्वरुपात नोंदला गेला.
तर डॉलरच्या तुलनेतील रुपयाचा घसरता प्रवास नव्या आठवडय़ाच्या प्रारंभीही कायम राहिला. सलग तिसऱ्या व्यवहारात घसरताना स्थानिक चलन डॉलरसमोर सोमवारी आणखी ९ पैशांनी घसरले. यामुळे रुपयाचा स्तर ६७.६८ वर स्थिरावला. गेल्या सलग तीन सत्रातील चलनातील कमकुवता १.२४ टक्क्य़ांची राहिली आहे.
भांडवली बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय विदेशी चलन विनियम मंचावर विपरित परिणाम करणारा ठरत आहे.
सेबीच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, गेल्या शुक्रवारी या गुंतवणूकदारांनी समभागांमधून आपली १५.३४ कोटी डॉलरची रक्कम काढून घेतली आहे.
२०१६ च्या सुरुवातीपासून तेजी अनुभवलेल्या रुपयातील गेल्या काही व्यवहारातील सातत्यातील घसरण थांबायचे नाव घेत नाही; परकी चलनाच्या तुलनेत स्थानिक रुपयाचा प्रवास आता चीनद्वारे जाहीर होणाऱ्या त्याच्या सकल राष्ट्रीय उत्पादन दराच्या आकडय़ावर राहिल, असे मत आयएफए ग्लोबलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक गोयंका यांनी व्यक्त केले आहे.
त्या देशातील किरकोळ विक्री तसेच औद्योगिक उत्पादन याबाबतची २०१५ च्या अखेरची स्थिती मंगळवारी अधिक स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.
भांडवली बाजार, रुपया, खनिज तेल असे सारे घसरत असताना मुंबईच्या सराफा बाजारांमध्ये मात्र सोमवारी लक्षणीय वाढ नोंदली गेली. शहरात स्टॅण्डर्ड सोने दर प्रति तोळा २४० रुपयांनी वाढून २६,१०० रुपयांवर गेला

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2016 7:49 am

Web Title: crude oil below 30 dollars
Next Stories
1 मुंबई शेअर बाजार इमारत पर्यटनस्थळ!
2 सेन्सेक्स २० महिन्यांच्या खोलात; मुंबई निर्देशांकाची २६७ अंश आपटी
3 ‘वन प्लस’ची ‘मेक इन इंडिया’ निर्मिती
Just Now!
X