आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या किमतीचा भडका आधीच चालू खात्यातील तूट व ढासळत्या रुपयाने ग्रस्त भारतीय अर्थव्यवस्थेसाठी डोकेदुखी ठरेल. मंगळवारी प्रति पिंप १११ डॉलपर्यंत गेलेले कच्च्या तेलाचे दरांनी आज पाच महिन्यांच्या उच्चांक गाठत प्रति पिंप ११५.९३ डॉलरचा स्तर गाठला. आखातील प्रमुख तेल-उत्पादक सीरियावर अमेरिका व पाश्चिमात्य दोस्त राष्ट्रांकडून सैनिकी कारवाई केली जाईल, या शक्यतेने आंतरराष्ट्रीय बाजारात अस्वस्थता वाढली. या वातावरणामुळे कच्चे तेल काही दिवसांतच १०० डॉलर प्रति पिंपवरून एकदम ११६ डॉलर प्रति पिंपच्या पुढे गेले आहेत. दरम्यान कच्चे तेल आयात करणाऱ्या देशातील तेल विपणन कंपन्यांना डॉलरचा पुरवठा करणारी स्वतंत्र खिडकी रिझव्‍‌र्ह बँकेकडून गुरुवारपासून कार्यन्वित केली जाणार आहे.