21 September 2020

News Flash

२००५ पूर्वीच्या नोटा बदलण्यास मुदतवाढ

२००५ पूर्वी सादर करण्यात आलेल्या चलनी नोटा बदलून घेण्याची मुदत रिझव्र्ह बँकेने आणखी वाढविली आहे.

२००५ पूर्वी सादर करण्यात आलेल्या चलनी नोटा बदलून घेण्याची मुदत रिझव्र्ह बँकेने आणखी वाढविली आहे. यानुसार २००५ पूर्वीच्या सर्व नोटा आता ३० जून २०१६ पर्यंत बदलता येतील. २००५ पूर्वीच्या ५०० तसेच १,००० रुपयांच्या नोटाही बदलून घेता येतील, असे रिझव्र्ह बँकेने बुधवारी स्पष्ट केले. २००५ पूर्वीच्या नोटा बदलण्याची यापूर्वीची मुदत येत्या ३१ डिसेंबर २०१५ रोजीची होती. या कालावधीपर्यंत सर्वच बँक शाखांमध्ये २००५ पूर्वीच्या नोटा बदलण्याची सुविधा आहे. मात्र १ जानेवारी २०१६ पासून ही सुविधा रिझव्र्ह बँकेच्या कार्यालयात तसेच मध्यवर्ती बँकेने निवडलेल्या काही बँक शाखांमध्येच उपलब्ध असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. डिसेंबर २०१३ ते जानेवारी २०१५ या १३ महिन्यांच्या कालावधीत रिझव्र्ह बँकेकडे २००५ पूर्वीच्या १६४ कोटी नोटा येऊन पडल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 5:37 am

Web Title: currency exchange get extension
Next Stories
1 रिलायन्स जिओ ‘बाजीगर’ ठरणार!
2 आयसीआयसीआय बँकेचा नाणे हस्तांतर मेळावा
3 बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाची नवीन ई-केवायसी प्रक्रिया
Just Now!
X