अनेकदा गॅस वितरक त्यांच्याकडूनच गॅस शेगडी घेण्याची सक्ती करतात. तशा प्रकारच्या तक्रारी तामिळनाडूत मोठय़ा प्रमाणात आल्या असून कुठेही वितरकांकडून गॅस शेगडी घेण्याची सक्ती केलेली नाही, गॅस शेगडी वितरकाकडून घ्यायची की नाही हे वैकल्पिक आहे असे तेल कंपन्यांनी म्हटले आहे.
 इंडिया ऑइल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एलपीजी जोड घेतल्यानंतर वितरकांकडूनच गॅस शेगडी घेण्याची सक्ती नाही असे परिपत्रक काढण्यात आले आहे.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन- एचपीसीएलच्या प्रवक्त्यानेही कंपनीने गॅस शेगडी वितरकाकडून घेण्याची सक्ती नाही असे म्हटले आहे. आम्ही कधीच ग्राहकांना तशी सक्ती करीत नाही असे त्यांनी म्हटले आहे.
सुरक्षिततेच्या कारणास्तव आयएसआय शेगडी ही आयएसआय चिन्ह असलेलीच खरेदी करावी असेही अधिकाऱ्याने सांगितले.