News Flash

टाटा कंपन्यांच्या बैठकांना सायरस मिस्त्री यांची दांडी!

‘मिस्त्री हटाव’ मोहिम मात्र युद्धपातळीवर

टाटा सन्सच्या संचालक मंडळाला मिस्त्री यांनी पत्र लिहिले आहे

‘मिस्त्री हटाव’ मोहिम मात्र युद्धपातळीवर

टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांच्या उचलबांगडीच्या कारवाईला अंतिम रूप देण्यासाठी गुरुवारी बोलावण्यात आलेल्या बैठकीला हंगामी अध्यक्ष रतन टाटा यांनी मुंबईतील मुख्यालयात उपस्थिती दर्शविली. टाटा सन्सच्या संचालक मंडळातील नवनियुक्त सदस्य एन. चंद्रशेखरन हे प्रथमच अशा बैठकीत सामिल झाले.

टाटा सन्सची उपकंपनी टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ची बैठक गुरुवारी सकाळीच झाली. या बैठकीनंतर टाटा सन्सच्या ‘बॉम्बे हाऊस’मधील बैठकीकरिता इशात हुसैन यांच्यासह कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रशेखरन हे रवाना झाले. टीसीएसचे चंद्रशेखरन यांची नियुक्ती त्यानंतर टाटा सन्सच्या संचालक मंडळावर झाली. गेल्याच आठवडय़ात त्यांच्यासह जग्वार लँड रोव्हरचे मुख्याधिकारी राफ स्पेथ हेही टाटा सन्सच्या संचालक मंडळावर नियुक्त झाले आहेत.

टीसीएसची मुख्य प्रवर्तक टाटा सन्सच्या संचालक मंडळाची बैठकही दुपारनंतर हंगामी अध्यक्ष रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली. तिला कंपनीचे संचालक वेणू श्रीनिवासन, अजय पिरामल आदीही या बैठकीला उपस्थित होते. समूहाच्या संचालक मंडळात नितीन नोहरिया, अमित चंद्रा, विजय सिंह, फरिदा खंबाटा या अन्य संचालकांचा समावेश आहे. मिस्त्री हे टाटा सन्सवर अद्याप संचालक असले तरी बैठक सुरू होईपर्यंत ते पोहोचले नव्हते.

टाटा सन्समध्ये १८.४० टक्क्यांसह मिस्त्री यांच्या शापूरजी पालनजी समूहाचा दुसऱ्या क्रमांकाचा हिस्सा आहे. टीसीएसपाठोपाठ टाटा मोटर्स, टाटा स्टील, इंडियन हॉटेल्स आदी उपकंपन्यांचीही विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात येणार आहे. टाटा केमिकल्स, इंडियन हॉटेल्समधील स्वतंत्र संचालकांनी मिस्त्री यांना पाठिंबा दर्शविला आहे.

टीसीएसचे नवे हंगामी अध्यक्ष इशात हुसैन यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी मुंबईत झालेल्या संचालक मंडळ बैठकीला निष्कासित अध्यक्ष सायरस मिस्त्री हे अनुपस्थित राहिले. तर टीसीएसची मुख्य प्रवर्तक टाटा सन्सची बैठक दुपारी हंगामी अध्यक्ष रतन टाटा यांच्या प्रमुख उपस्थित झाली. मिस्त्री यांच्या निष्कासनानंतर टाटा सन्सची ही पहिली बैठक होती. मिस्त्री यांना हटविण्यासाठी आवश्यक असलेल्या भागधारकांच्या मंजुरीकरिता प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ही बैठक बोलाविण्यात आली होती.

टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून २४ ऑक्टोबरला मिस्त्री यांना दूर केल्यानंतर समूहातील माहिती तंत्रज्ञान कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस) मधूनही मिस्त्री यांना दूर करण्यात आले होते. टीसीएसमध्ये फेरबदल करताना कंपनीच्या अध्यक्षपदी इशात हुसैन यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. कंपनीकरिता नवा अध्यक्ष लवकरच नियुक्त केला जाईल.

हुसैन यांच्या अध्यक्षतेखाली टीसीएसची पहिली बैठक गुरुवारी सकाळी ११ वाजता दक्षिण मुंबईतील कंपनीच्या मुख्यालयात झाली. बैठकीला हुसैन यांच्यासह संचालक ओ. पी. भट हेही उपस्थित होते.

मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून हटविण्यासाठी आवश्यक असलेल्या भागधारकांच्या मान्यतेकरिता टीसीएसची विशेष सर्वसाधारण बैठक बोलाविण्याचे पाऊल यापूर्वीच उचलण्यात आले आहे. या बैठकीच्या तारखेवर गुरुवारच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणे अपेक्षित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 1:52 am

Web Title: cyrus mistry absent tata company meeting
Next Stories
1 बँकांकडे वाढता निधी ओघ; मात्र ठेवींदाराच्या व्याजलाभात घट!
2 सेन्सेक्स घसरण सलग चौथ्या सत्रात कायम
3 हवाई क्षेत्रासाठी ‘कोलंबस’ दाखल
Just Now!
X