News Flash

माझ्या नावाने आरोपांवर पांघरुणाचा प्रयत्न

एअर एशिया प्रकरणात मिस्त्री यांचा आर. व्यंकटरमणनवर शाब्दिक हल्ला

एअर एशिया प्रकरणात मिस्त्री यांचा आर. व्यंकटरमणनवर शाब्दिक हल्ला

मुंबई : टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर एअरएशियाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या सायरस मिस्त्री यांनी नव्याने हल्ला चढविला आहे. एअरएशिया समूहाचे टोनी फर्नाडिस यांच्याविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाने तक्रार दाखल केल्यामुळे टाटा ट्रस्टचे विश्वस्त आर. व्यंकटरमणन यांनी व्यक्तिगत प्रामाणिकता तपासण्याचे आवाहन मिस्त्री यांनी केले आहे. आपल्या नावाने स्वत:च्या आरोपावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांप्रती टाटा समूहानेही विचार करावा, असेही मिस्त्री यांनी म्हटले आहे.

मिस्त्री टाटा समूहातून निष्कासित झाल्यानंतर त्यांनी एअरएशिया आणि टाटा समूह यातील व्यवहाराबाबत साशंकता व्यक्त केली होती. एअरएशियावरील तपास यंत्रणांच्या कारवाईनंतर एअरएशिया इंडिया लिमिटेड व सायरस मिस्त्री यांच्यातील शाब्दिक युद्ध रंगले आहे. कारवाईनंतर एअरएशिया इंडिया लिमिटेडने मिस्त्री यांच्या आरोपांचा समाचार घेतला असतानाच मिस्त्री यांनी गुरुवारी प्रसिद्धीपत्रक जारी करत टाटा ट्रस्टच्या विश्वस्तांवर टीका केली आहे. आर. व्यंकटरमणन यांनी स्वत:ची व्यक्तिगत प्रामाणिकता आणि भ्रष्ट व्यापारी व्यवहारांचा होणारा आरोप पडताळून पाहावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तपास यंत्रणांच्या स्वतंत्रतेवर प्रश्न उपस्थित करण्याचा धिक्कारजनक प्रयत्न हा कारवाईस पात्र आहे, असे नमूद करत मिस्त्री यांनी आपल्याविरुद्ध झालेले मत्सरपूर्ण आणि बदनामीकारक आरोप नाकारत असल्याचे स्पष्ट केले आहे. मिस्त्री या पत्रकात म्हणतात की, काही दिशाभूल करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या शंकास्पद हेतूंनी आज टाटा समूहाला काळिमा लावत आहेत. आर. वेंकटरामन हे स्थापनेपासूनच एअरएशिया इंडिया प्रकरणात गोवले आहेत. टाटा सन्सच्या संचालक मंडळात ते असून कंपनीत त्यांचा १.५% वाटा आहे. आपण केवळ गैर-कार्यकारी संचालक असल्याचे ते पुढे करत असलेले कारण निर्थक ठरते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 2:38 am

Web Title: cyrus mistry hits back on venkataraman in airasia case
Next Stories
1 अनमोल अंबानींच्या पहिल्याच डीलमध्ये रिलायन्सला 25पट फायदा
2 बँका बंद; एटीएमही ठप्प ! मे महिन्याचे वेतनही रखडणार
3 सलग दुसऱ्या सत्रात घसरण
Just Now!
X