डॅटसनच्या रेडी गो या क्रॉसओव्हर व हॅचबॅकचा संगम असलेल्या कारसाठीची पूर्वनोंदणी कंपनीने सुरू केली आहे. या नोंदणीनंतर प्रत्यक्ष कार ही ग्राहकांना पुढच्या महिन्यात ताब्यात मिळेल.
या कारची किंमत २.५० ते ३.५० लाख रुपये दरम्यान असेल. कंपनीच्या १६५ शहरांमधील २१७ दालनांमधून ५,००० रुपयांच्या डाऊन पेमेंटसह या नव्या वाहनाकरिता चालनांना नोंदणी करता येणार आहे. मार्च २०१७ पर्यंत कंपनीची ३०० विक्री व सेवा दालने असतील, अशी माहिती निस्सान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अरुण मल्होत्रा यांनी दिली.