24 November 2020

News Flash

वीजनिर्मिती कंपन्यांना कर्जविषयक दिलासा

सर्वोच्च न्यायालयात आठवडय़ात सुनावणी

(संग्रहित छायाचित्र)

कर्ज हप्ते स्थगितीप्रकरणी वीज निर्मिती कंपन्या व अन्य याचिकाकर्त्यांनी अपेक्षित दिलाशाविषयी त्यांच्या सूचना व प्रस्ताव मांडावेत आणि रिझव्‍‌र्ह बँक तसेच केंद्र सरकारने त्या संबंधाने उत्तरादाखल आपली भूमिका स्पष्ट करावी, असे सुचवून सर्वोच्च न्यायालयाने पुढील आठवडय़ात हे प्रकरण सुनावणीला घेतले जाईल असे स्पष्ट केले.

करोनाकाळात जाहीर करण्यात आलेल्या सहा महिन्यांच्या कर्ज हप्ते स्थगितीच्या योजनेसंबंधी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाने समाधान झालेल्या याचिकांना गुरुवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने निकालात काढले. केंद्रीय अर्थमंत्रालयाने कर्ज हप्ते स्थगितीचा आंशिक तसेच पूर्ण लाभ घेतलेल्या आणि न घेतलेल्या दोन्ही प्रकारच्या कर्जदारांना सहा महिन्यांच्या काळातील चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील तफावत माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

तथापि वीजनिर्मिती कंपन्यांचे प्रतिनिधित्व करताना ज्येष्ठ विधिज्ज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी, रिझव्‍‌र्ह बँकेच्या परिपत्रकाचा हेतू जरी मदत देण्याचा असला तरी त्यातील अपवाद करण्यात आलेले अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे पाहता हा अपेक्षित दिलासा मिळत नसल्याचे सांगितले.

एलआयसी, पर्यायी गुंतवणूक निधी, विदेशी गुंतवणूकदार (एफपीआय) तसेच विदेशी बँकांकडून वीज उत्पादकांनी मुख्यत्वे कर्ज घेतले असून, अशा कर्जावर मर्यादा घालण्यासंदर्भात सिंघवी यांनी मध्यवर्ती बँकेचे निर्देशांच्या फेरविचाराची मागणी केली. त्यांच्याकडून घेतले गेलेले कर्जही पुनर्बाधणीसाठी पात्र ठरविले जावे, अशी त्यांनी मागणी केली. या उणिवा राहून गेल्या असून त्या रिझव्‍‌र्ह बँकेने दुरुस्त करणे आवश्यक असल्याचे सिंघवी म्हणाले. वीज उत्पादकांची एकूण कर्जभार १.२ लाख कोटी रुपयांचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने रिझव्‍‌र्ह बँक व केंद्र सरकारला त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 12:14 am

Web Title: debt relief to power generating companies abn 97
Next Stories
1 लक्ष्मी विलास बँक विलीनीकरणाला विरोध
2 सप्ताहअखेर तेजीत
3 बाजार-साप्ताहिकी : कसोटीचा काळ
Just Now!
X