रिलायन्स रिटेल  आणि फ्युचर रिटेल यांच्या दरम्यान झालेल्या व्यवहाराविरोधातील अ‍ॅमेझॉनच्या याचिकेवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राखून ठेवला.

रिलायन्स-फ्युचर समूहाच्या २४,७३१ कोटी रुपयांच्या व्यवहारावर आक्षेप घेणाऱ्या सिंगापूरच्या आतप्त्कालीन लवादाचा निर्णय भारतातील कायद्यांशी सुसंगत आहे किंवा नाही हे तपासूनच निर्णय घेतला जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत अ‍ॅमेझॉनने सिंगापूरचा निर्णय वैध असून तो लागू करण्याची मागणी केली. मात्र न्या. आर. एफ. नरिमन, बी. आर. गवई यांच्या खंडपीठाने हा  निकाल राखून ठेवण्यात येत असल्याचे सांगितले. फ्युचर समूहाची बाजू ज्येष्ठ विधिज्ज्ञ हरीश साळवे हे मांडत आहेत.