आजच्या तरुण भारताला आयुष्यात अचानक उद्भवू शकणाऱ्या आणिबाणीच्या परिस्थितीमुळे भेडसावणाऱ्या आर्थिक अस्थैर्याला तोंड देण्यासाठी आपण पुरेसे सक्षम नाही, असे वाटत असून मुदतविमा खरेदी करण्यामागे अपत्यांच्या आर्थिक भवितव्याविषयी वाटणारी चिंता हे प्रमुख कारण असल्याचे मॅक्स लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने (मॅक्स लाइफ/कंपनी) स्पष्ट केले आहे.

मॅक्स लाइफने कंतार आयएमआरबीच्या सहयोगाने केलेल्या ‘इंडिया प्रोटेक्शन कोशंट’ सर्वेक्षणानुसार, भविष्यात अपत्याच्या शिक्षणासाठी मिळणारे एकरकमी पैसे हे ४४% शहरी भारतीयांसाठी मुदतविमा खरेदीचे प्रमुख कारण असून अपत्य असलेल्या आजच्या पिढीसाठी ४८% सह हे सर्वाधिक महत्त्वाचे कारण आहे.

मॅक्स लाइफचे संचालक आणि मुख्य विपणन अधिकारी आलोक भान म्हणाले, मुले मोठी होत असताना पालकांच्या आयुष्यात अनेक महत्त्वाचे टप्पे येत असतात. मुलांना चांगली मूल्ये देण्यापासून त्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळवून देणे, उच्च शिक्षण आणि नंतर विवाहासाठी त्यांना पाठबळ देणे अशा अनेक बाबी असतात. हे सर्व महत्त्वाचे टप्पे विनासायास पार करता यावेत, यासाठी अत्यंत काटेकोरपणे आर्थिक नियोजन करणे गरजेचे असते. यादृष्टीने आजच्या तरुण भारताला आपल्या कुटुंबाचे भवितव्य संरक्षित करण्यासाठी मुदतविमा खरेदीचे महत्त्व पटले असल्याची बाब दिलासादायक आहे.

कुटुंबात अपत्याचा जन्म हे नव्या पिढीसाठी मुदतविमा खरेदीचा सर्वात मोठा आरंभबिंदू असून आजही भारतीय कुटुंबांच्या आर्थिक नियोजनाच्या केंद्रस्थानी अपत्येच असल्याचे दिसून येते, असेही ते म्हणाले.

४७% राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत अपत्य असलेल्या आजच्या पिढीत मुदतविम्याबाबत जागरुकतेचे प्रमाण अधिक म्हणजे ५०% आहे. तरुण अपत्ये असलेली तरुण पिढी मुदतविम्यामुळे मिळणारम्य़ा लाभांबाबत अधिक जागरूक असून कुठल्याही अकस्मात कारणांमुळे आपल्या मुलांच्या महत्त्वाकांक्षेवर विपरित परिणाम होऊ नये, यासाठी गुंतवणूक करत आहेत, याचेच हे निदर्शक आहे.

अपत्य असलेल्या नवी पिढीचे निवृत्तीच्या नियोजनापेक्षाही मुलांचे शिक्षण आणि विवाहासाठी बचतीला प्राधान्य असल्याचेही हे सर्वेक्षण नमूद करते.

मॅक्स लाइफ इन्शुरन्सचे ‘इंडिया प्रोटेक्शन कोशंट’चे सर्वेक्षण  अपत्य असलेली नवी पिढी काळजी घेण्यात आघाडीवर  ७९% कुटुंब अपत्यांच्या शिक्षणासाठी बचत करतात