18 September 2020

News Flash

नोटांची चणचण १३ मार्चपासून संपुष्टात!

बँक खात्यातून कितीही पैसे काढण्याला मुभा

बँक खात्यातून कितीही पैसे काढण्याला मुभा

केंद्र सरकारने घेतलेल्या निश्चलनीकरण निर्णयानंतर बँक खात्यातून पैसे काढण्यावरील सर्व मर्यादा आता उठविल्या जाणार आहेत. येत्या १३ मार्चपासून लोकांना त्यांच्या बँक खात्यामधून कितीही रक्कम काढता येईल, असे रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी स्पष्ट केले.

बँक खात्यामधून पैसे काढण्यावरील र्निबध दोन टप्प्यांमध्ये उठविण्यात येणार आहेत. सध्या बँकेतील बचत खात्यामधून आठवडय़ाला २४ हजार इतकी रक्कम काढता येऊ  शकते. मात्र, येत्या २० फेब्रुवारीपासून ही मर्यादा प्रति आठवडा ५०,००० रुपयांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. २० फेब्रुवारी ते १३ मार्च या काळात ही मर्यादा कायम राहील. त्यानंतर १३ मार्चपासून बँक खात्यातून रक्कम काढण्याबाबत खातेदारांवर कोणतेही र्निबध नसतील. ग्राहकांना त्यांच्या खात्यातून पूर्वीप्रमाणे हवी तेवढी रक्कम काढता येणार आहे. आर्थिक वर्षांतील सहाव्या द्विमासिक पतधोरणानंतर रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. चलन चणचण संपुष्टात आणण्याच्या या निर्णयामुळे जनसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, २७ जानेवारीपर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेत एकूण ९.९२ लाख कोटी रुपये मूल्याच्या ५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्याची माहिती यावेळी रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी यांनी दिली. नवीन नोटांद्वारे निश्चलनीकरण झालेल्या चलनाचे पुनर्भरण नियमितपणे सुरूच असल्याचे त्यांनी सांगितले. ८ नोव्हेंबर २०१६च्या मोदी सरकारच्या निश्चलनीकरणाच्या निर्णयानंतर बँकेतील खाते आणि एटीएममधून रक्कम काढण्यावरही रिझव्‍‌र्ह बँकेकडून अनेक र्निबध लादण्यात आले होते. गेल्या काही काळात हे र्निबध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात आले असून ते पुढील महिन्यापासून पूर्णपणे संपुष्टात येणार आहेत.आलेल्या आर्थिक सर्वेक्षणाने व्यक्त केला आहे.

आगामी वर्षांत व्याजदर एकंदर अर्धा ते पाऊण टक्क्य़ांनी खालावणे शक्य आहे, असाहीोँक ऑफ अमेरिका-मेरिल लिंच या संस्थेच्या विश्लेषणाचा निर्वाळा आहे.  अर्थव्यवस्थेला निश्चलनीकरणाचा धक्का बसला असतानाही, डिसेंबरमधील पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवण्यात आले. आता एप्रिल ते सप्टेंबर या औद्योगिकदृष्टय़ा नरमाईच्या गुंतवणूकचक्राला गती देण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर कपातीचे पाऊल पडणे अपेक्षित असल्याचा अहवालाचा कयास आहे.

भारतात महागाई दर स्थिरावत असला तरी जागतिक घडामोडी लक्षात घेऊनच व्याजदराबाबत निर्णय घेतला जाईल, असेही सांगितले जाते. गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी कार्यभार स्वीकारताच पाव टक्के दर कपात केली होती. आता त्यांच्या तिसऱ्या पतधोरणावर सर्वाची नजर आहे.

untitled-25

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 1:57 am

Web Title: demonetisation in india 4
Next Stories
1 हॅवेल्सचा वैयक्तिक निगा बाजारात प्रवेश
2 ईएलएसएस कर वजावट आणि करमुक्त संपत्ती निर्माणाचे तिहेरी लाभ
3 ‘डिस्कव्हरी’चा नवीन क्रीडा वाहिनीसह भारतात विस्तार
Just Now!
X