बजाज ऑटोची ‘डिस्कव्हर १००टी’ ही नवी मोटरसायकल बाजारपेठेत दाखल झाली असून आकर्षक स्टाईल, १००टी चे गॅस भरलेले नायट्रॉक्स सस्पेंशन, १०० सीसी इंजिन ही या मोटरसायकलची वैशिष्टय़े आहेत. नवीन डिस्कव्हरच्या पुण्यातील शंभराव्या गाडीचे वितरण नुकतेच करण्यात आले. यावेळी बजाजच्या विक्री विभागाचे जनरल मॅनेजर विमल सुंबली आणि झोनल मॅनेजर विकल्प कपूर उपस्थित होते. या मोटरसायकलला बजाजचे पेटंट असलेले डीटीएस-आय तंत्रज्ञान असलेले इंजिन आहे. या मोटरसायकलला १०.२ पीएसची शक्ती असून ती इतर मोटारसायकल्सपेक्षा ३० टक्के अधिक आहे. ८७.३ किलो मिटर प्रती लिटर मायलेज देत असल्याचा दावा बजाजने केला आहे. डिस्कव्हर १००टी फ्लेम रेड, ब्रिलियंट ब्ल्यू, ब्लॅक रेड व ब्लॅक ब्लू अशा ४ रंगांमध्ये उपलब्ध आहे.