दक्षिणेतील खासगी बँक असलेल्या धनलक्ष्मी बँकेचे देशातील एखाद्या सार्वजनिक बँकेत विलीनीकरण करावे, अशी सूचना सरकारला करण्यात आली आहे. बँक अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन’ (एआयबीओए)ने याबाबत मागणी केली आहे. १९२० साली केरळात स्थापन झालेल्या धनलक्ष्मी बँकेत सध्या वित्तीय अनियमितता सुरू असून तिच्या आर्थिक व्यवहारांविरुद्ध लक्ष वेधणाऱ्या अधिकारी, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आल्याचे एआयबीओएने म्हटले आहे. १०५ वर्षे जुन्या नेडुंगडी बँकेचीही अशीच स्थिती असताना तिला २००३ मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेत सामील करून घेण्यात आले होते, अशी आठवण यानिमित्ताने संघटनेचे सरचिटणीस एस. नागराजन यांनी सांगितली आहे.