31 May 2020

News Flash

डीएचएफएलमधील आर्थिक घोटाळ्यांचा आता ‘एसएफआयओ’कडून तपास

मुंबईतील ‘पीएमसी’ बँकेतील कर्ज घोटाळ्याशी या डीएचएफएलमधील गैरव्यवहाराचा संबंधही चौकशीच्या रडारवर आहे.

| November 2, 2019 05:37 am

नवी दिल्ली : अरिष्टग्रस्त गृहवित्त कंपनी दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन अर्थात डीएचएफएलमध्ये प्रवर्तकांकडूनच केल्या गेलेल्या आणि प्रथमदर्शनी तथ्य आढळलेल्या घोटाळ्यांचा ‘गंभीर घोटाळे अन्वेषण संस्था (एसएफआयओ)’मार्फत तपास करण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला असल्याचे शुक्रवारी वरिष्ठ सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.

डीएचएफएलने बँकांकडून घेतलेल्या तब्बल ३१,००० कोटी रुपयांचे कर्ज प्रवर्तकांनी स्थापलेल्या बनावट (शेल) कंपन्यांकडे वळविला असल्याचा आरोप आहे. मुंबईतील ‘पीएमसी’ बँकेतील कर्ज घोटाळ्याशी या डीएचएफएलमधील गैरव्यवहाराचा संबंधही चौकशीच्या रडारवर आहे.

डीएचएफएलसंबंधाने आवश्यक तो प्राथमिक अहवाल कंपनी निबंधकांच्या मुंबई कार्यालयाकडून केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयाला काही दिवसांपूर्वी सुपूर्द करण्यात आला आहे. या अहवालात निधीची अफरातफर आणि तो अन्यत्र वळविला गेल्याचे स्पष्ट संकेत दिले गेले आहेत.

एप्रिल २०१५ ते मार्च २०१९ दरम्यान या देशातील चौथ्या क्रमांकाची गृहवित्त कंपनी- डीएचएफएलच्या ताळेबंदाची आणि कंपनीने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून उचललेले कर्ज आणि त्याच्या विनियोगाची विशेष तपासणी करण्याचे काम केपीएमजीकडे सोपविण्यात आले होते. त्यातही प्रवर्तकांनी त्यांच्या अन्य कंपन्यांकडे निधी वळविला असल्याचे केपीएमजीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ‘एसएफआयओ’कडून चौकशी सुरू केली जाण्याला हे सबळ कारण असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2019 5:37 am

Web Title: dhfl financial scams now investigation by sfio zws 70
Next Stories
1 ‘मारुती’ला सात महिन्यांनंतर विक्रीतील सुगीचे दर्शन
2 ऐन दिवाळीतही ‘जीएसटी’ संकलन घसरतेच
3 ‘सेन्सेक्स’ची ४० हजारांवर तग
Just Now!
X