News Flash

लवकर सेवानिवृत्तीचे तोटेही लक्षात घेणे आवश्यक!

साधारणत: १५/२० वर्षांपूर्वी पोस्ट व बँक यांच्या मुदत ठेवीकडे लोकांचा कल होता आणि तो स्वाभाविकच होता.

पुरुषोत्तम कृ. आठलेकर

साधारणत: १९९० पासून जेव्हा जागतिकीकरण व आधुनिकरणाचे वारे वाहू लागले त्यावेळेस त्याचा सर्वात जास्त फटका बसला तो मनुष्यबळाला (Man Power).

मग अगदी सर्रास सरकारी कार्यालये ते खाजगी कंपन्यामधून स्वेच्छा सेवानिवृत्ती (VRS) अगदी ‘गोल्डन हँडशेक’च्या नावाखाली आर्थिक फायदे देऊन कर्मचारी कपातीला सुरुवात झाली. आणि एकरकमी मिळणाऱ्या रकमेच्या हव्यासापोटी कोणतेही आर्थिक नियोजन न करता सेवानिवृत्ती स्वीकारली.

साधारणत: १५/२० वर्षांपूर्वी पोस्ट व बँक यांच्या मुदत ठेवीकडे लोकांचा कल होता आणि तो स्वाभाविकच होता.

कारण त्यावेळेस पोस्टाचा व्याजदर जवळपास १२.५% होता आणि मिळणारा बोनससुद्धा १०% होता.

कालांतराने अनेक खाजगी कंपन्यांचा अर्थक्षेत्रात शिरकाव झाला आणि स्पर्धा वाढू लागली. आर्थिक फायद्याची विविध आमिषे दाखवून अटी व सेवांच्या माध्यमातून लाभार्थीना हवा तसा परतावा मिळत नसल्यामुळे गुंतवणुकीचे नियोजन चुकीचे होऊ  लागले.

त्यामुळे १५/२० वर्षांपूर्वी घेतलेली स्वेच्छानिवृत्ती त्यावेळेस मिळालेला पैसा केलेली गुंतवणूक याचे वाढणारी महागाई, जीवनशैलीत झालेले बदल पाहाता जर विश्लेषण केले तर सेवानिवृत्तीचा निर्णय रास्त नव्हता असेच म्हणता येईल.

अशी बव्हतांशी उदाहरणे आहेत ज्यांनी योग्य आर्थिक नियोजन, काटकासरीचे धोरण अवलंबले तेच स्थिरावले ही वस्तुस्थिती आहे.

लवकर सेवानिवृत्ती आणि साठाव्या वर्षी घेतलेली निवृत्ती याचा फायदे आणि तोटे अशा दोन्ही बाजूंनी विचार करणे गरजेचे आहे.

काम, घाम, दाम या गोष्टींच खऱ्या अर्थाने कुटुंबाला आर्थिक स्वास्थ्य प्राप्त होत असते.

फायदे :

१) शारीरिक, आर्थिक, मानसिक माणूस स्थिरावतो.

२) सेवा कालावधी उपलब्ध असल्यामुळे मुलाची शिक्षण, धार्मिक कार्ये आर्थिक नियोजनातून करू शकतो.

३) उद्योगी असल्यामुळे कोणत्याही चिंता भेडसावत नाहीत.

४) सेवानिवृत्तीचा दिवस व वर्ष माहिती असल्यामुळे आर्थिक नियोजन, वेळेचा सदुपयोग याप्रमाणे आराखडा आखू शकतो.

५) सेवानिवृत्ती होईपर्यंत दरमहा निश्चित उत्पन्न पदरात पडत असते.

६) काम करत असताना समाजात तुमचे एक ‘स्टेटस सिम्बॉल’ असते.

या व्यतिरिक्त अप्रत्यक्ष भरपूर फायदे असतात ते आपल्याला वेळोवेळी मिळत असतात.

तोटे :

१) अर्थसाक्षरता व अर्थ नियोजन असेल तरच लवकर सेवानिवृत्तीचा विचार करावा.

२) मिळणारी आगाऊ  रक्कम ही जरी मोठी वाटत असली तरी योग्य पद्धतीने गुंतवणूक करणे महत्वाचे आहे.

३) आज मिळालेली रक्कम आणि व्याजदरामधील लवचिकता म्हणजे वाढत नाही कमी होतात.

४) अधिक व्याजदर देणाऱ्या कंपन्या तेथे जोखीमसुद्धा तेवढीच असते त्याचासुद्धा विचार केला गेला पाहिजे.

५) घरखर्च, भविष्यातील तरतुदी आणि दर महिन्याचे ‘बजेट’ याचासुद्धा विचार करावयास हवा.

६) मासिक अर्थतरतुदीमुळे घरात एक प्रकारे सौख्य असते हे झाले महत्वाचे तोटे असे अप्रत्यक्ष तोटेसुद्धा असतील जे आपण योग्य तो विचार विनिमय न करून जर लवकर सेवानिवृत्ती घेतली तर आपल्याला त्याच्याशी सामना करावा लागेल. अलीकडे दैनंदिन प्रवास करून कार्यालयात जाणे खरोखरीच कठीण होत चालले आहे ही जरी वस्तुस्थिती असली तरी त्याचबरोबरीने ‘वर्क फ्रॉम होम’ तसेच ‘फ्लेक्झी — अवर्स’सारख्या संकल्पना राबवल्या जात आहेत.

pkathalekar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 2:07 am

Web Title: disadvantages of early retirement vrs
Next Stories
1 डि मार्टच्या शेअरची सव्वा वर्षात 299 रुपयांवरून 1600 रुपयांवर झेप
2 दिवाळीपर्यंत सोनं ३४ हजारांवर ?
3 बँकांच्या बुडीत कर्ज समस्या निराकरणासाठी मालमत्ता पुनर्बांधणी कंपनीसाठी सरकारचा पुढाकार
Just Now!
X