News Flash

मराठी उद्योगभूषण पुरस्कारांचे वितरण

कार्यक्रमाचे अतिथी एअर कंट्रोल समूहाचे संचालक अशोक पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

 

मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्र मंडळाच्या अलीकडेच झालेल्या ३५ व्या वर्धापनदिन सोहळ्यात सहा उद्योजकांना ‘मराठी उद्योगभूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. एम-इंडिकेटर या लोकप्रिय मोबाइल अ‍ॅपची निर्मिती करणारे सचिन टेके, मौज प्रकाशनगृहाचे माधवराव भागवत, वास्तुविशारद शशिकांत देशमुख, विनकोट प्रा. लि.चे प्रदीप ताम्हाणे, अभिनेते व निर्माते प्रशांत दामले आणि हॉटेल आस्वादचे श्रीकृष्ण सरजोशी यांचा  कार्यक्रमाचे मुख्य अतिथी एअर कंट्रोल समूहाचे संचालक अशोक पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर मंडळाच्या अध्यक्ष अचला जोशी, कार्याध्यक्ष अनंत भालेकर, सारस्वत बँकेचे उपाध्यक्ष गौतम ठाकूर, केसरी टूर्सचे केसरी पाटील उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2016 5:40 am

Web Title: distribution of marathi business industry award
Next Stories
1 ‘मुत्थूट होमफिन’चे मुंबईत कार्यालय
2 वेतन आयोग राबविल्याने अर्थगती वाढेल, तुटीची तूर्तास चिंता नको!
3 संपाचा परिणाम शून्य; मुंबईत स्टेट बँकेच्या शाखांमध्ये नियमित व्यवहार
Just Now!
X