News Flash

सक्तीच्या अध्यायाची स्वत:पासून सुरुवात..

हेल्मेटसह नव्या बाइकची स्वारीसह छबीसाठी सरसावताना

वलयांकित तारे-तारका अथवा नामांकित खेळाडूंकडून आपली नवी उत्पादने बाजारात आणण्याची प्रथा असताना, आता ती भूमिका खुद्द धोरणकर्तेच निभावू लागल्याने काहीशी मागे पडू लागली आहे. राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी याच नव्या प्रथेनुरूप बुधवारी हीरो मोटोकॉर्पच्या संपूर्ण एतद्देशीय तंत्रज्ञान-नावीन्यतेने घडलेल्या स्प्लेन्डर श्रेणीतील आयस्मार्ट या मोटारसायकलचे फोर्टपॉइंट, माहीम येथे अनावरण केले. अर्थात दुचाकी विक्रेत्यांनी आपल्या प्रत्येक ग्राहकाला दोन आयएसआय चिन्ह असलेले हेल्मेट्स घेणे बंधनकारक करावे, असे फोर्टपॉइंटचे व्यवस्थापकीय संचालक संदीपकुमार बाफना यांना उद्देशून सूचना देण्याचे त्यांनी निमित्तही साधले. इतकेच नव्हे तर छायाचित्रकांरांपुढे, हेल्मेटसह नव्या बाइकची स्वारीसह छबीसाठी सरसावताना, हेल्मेट-सक्तीचा हा अध्याय आपण स्वत:पासून सुरू करीत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 7:36 am

Web Title: diwakar raote lauches hero splendor ismart bike in mumbai
Next Stories
1 सेन्सेक्स पुन्हा २८ हजारांवर; निफ्टी ८,६०० पल्याड!
2 ओएनजीसी, हिंदुस्तान पेट्रोलियम ‘एमआरपीएल’मधील हिस्सा विकणार!
3 …आणि सरकारला राजन यांच्यापुढे नमते घ्यावे लागले
Just Now!
X