बीस्पोक टेलरिंगची उंबरठय़ापर्यंत सेवा
sh03देशातील सर्वात जुने बीस्पोक म्हणजे प्रत्येक व्यक्तीनुरूप बेतून तयार वस्त्रांचे रचनाकार असलेल्या माधव मेन्स मोड्स (एमएमएम) यांनी देशात ‘ट्रॅव्हलिंग टेलर्स’ या नव्या संकल्पनेला जन्म दिला आहे. अनेक बडे राजकीय नेते, अगदी पंतप्रधान, राष्ट्रपती ते मंत्रिगणांसह, उद्योगधुरिणांसह, बॉलीवूड ताऱ्यांचा अभिजन ग्राहकवर्ग मिळविणाऱ्या माधव अगस्ती यांनी आता ग्राहकांच्या उंबरठय़ापर्यंत जाऊन बीस्पोक सूट्स, शर्ट्स, नीटवेअर प्रस्तुत करणारी ही नवीन सेवा सुरू केली आहे. बीस्पोक टेलरिंगला नव्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या या सेवेत ग्राहकांना स्टायलिंगचा सल्ला आणि इच्छित वस्त्रासाठी ७०० पेक्षा अधिक कापडांमधून निवडीचा पर्यायही दिला जाईल. http://www.mmm1975.com या संकेत स्थळाला भेट देऊन ग्राहकांना या सेवेचा तपशील आणि भेटीची वेळ व ठिकाणही ठरविता येईल.

sh02सुवासिक मसाला अगरबत्ती
सणोत्सवात फराळाच्या गोडधोडीसह, दिव्यांची आरास, जोडीला आल्हादायक वातावरणनिर्मिती करणाऱ्या अगरबत्तीचा दरवळणारा सुगंध प्रत्येकाला आवडणाराच ठरेल. सणासुदीचा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी अगरबत्ती क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेल्या निखिल प्रॉडक्ट्स, बंगळुरु या कंपनीने दर्जेदार उत्पादने बाजारात आणली आहेत. आनंदा, याज्ञिक, सँडलवूड, प्रभूदर्शन, सुगंधा या सोबतच कंपनीने ‘अबीर’ या नावाने एक प्रीमियम अगरबत्ती आणली आहे.

ब्रिटानियाची ‘शुभ कामनाएं’ गिफ्ट पॅक्स
sh04सणोत्सवात मित्र-परिवाराला प्रेमाचा बंध दृढ करण्यासाठी भेटवस्तू देण्याच्या प्रथेत, या भेटवस्तूंची निवड सोपी करणारा पर्याय ब्रिटानियाने आपल्या खास ‘शुभ कामनाएं’ गिफ्ट पॅक्सद्वारे दिला आहे. ड्रायफूट्स, चॉकलेट्स, मीठा-नमकिन या दिवाळीच्या भेटवस्तू देण्याच्या परंपरेवर आधारित ही श्रेणी ब्रिटानियाने १०० रुपयांपासून ते २५० रुपयांपर्यंतच्या विविध रचनेत आणि आकर्षक ज्वेल टोन पॅक्समध्ये उपलब्ध केली आहे.

sh05डिलेक्टा फूड्सचे गिफ्ट पॅक्स
खाद्य व पेय क्षेत्रातील डिलेक्टा फूड्सचे दिवाळीनिमित्त भेटवस्तू म्हणून आपल्या विविध दुग्ध व खाद्य उत्पादनांचा गुच्छ एकत्रित स्वरूपात आकर्षक वेष्टनांत प्रस्तुत केला आहे. चहा, कॉफी, मोचा, हॉट चॉकलेट, रिअल मिल्क, टॉमेटो सूप आणि साखरेची पाकिटे अशा विविध उत्पादनांचे पर्याय या गिफ्टपॅक्समध्ये ग्राहकांसमोर ठेवण्यात आले आहेत.

नैसर्गिक ‘बेअरएव्हर’
sh01‘वेट अ‍ॅण्ड ड्राय’ या व्यक्तिगत निगा उत्पादनांच्या निर्माता कंपनीने नैसर्गिकरीत्या शरीरावरील नको असलेल्या केसांपासून मोकळीक मिळवून देणारे उत्पादन ‘बेअरएव्हर’ प्रस्तुत केले आहे. देशात सौंदर्यपूरक उत्पादनांमध्ये हेअर रिमूव्हल हा एक अभिन्न घटक असला तरी त्याच्या पद्धती अद्याप पारंपरिकच असून अनेकांना अनेकवार पार्लरमध्ये जाऊन मदत घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. या पाश्र्वभूमीवर १०० टक्के नैसर्गिक घटकांसह बनलेले बेअरएव्हर हा यावरील कायमस्वरूपी व प्रभावी उपाय असल्याचा उत्पादकांचा दावा आहे.