करोना संकटामध्ये बँक ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. यूपूआय, रुपे आणि भीम (UPI, RuPay BHIM) च्या माध्यामातून झालेल्या ट्रांजेक्शनवर चार्ज लावू नका असा आदेश रविवारी आयकर विभागाने बँकाना दिला आहे. एक जानेवारी २०२० पासून आकारण्यात आलेले शुल्क ग्राहकांना परत करावे असे निर्देशही देण्यात आले आहेत.

पीटीआयच्या वृत्तानुसार, केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (Central Board of Direct Taxes) ‘इनकम टॅक्स एक्ट सेक्शन-269 एसयू’ नुसार निर्णय घेतला आहे. त्यानुसार इलेक्ट्रॉनिक प्लेटफॉर्म वर फीस किंवा कर लावण्यासंदर्भातील एका सर्कूलरमध्ये बँकाना सूचना दिली आहे. भविष्यात ऑनलाइन ट्रान्जेक्शनवर कोणतीही फीस लावू नये असे आदेश दिले आहेत. सरकारने डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहित करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. इनकम टॅक्स एक्ट सेक्शन-269 एसयूमध्ये एक नवीन नियम जोडला आहे. वर्षभरात एखाद्या व्यक्तीचा ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार असेल तर त्याला वर्षातून दोन डिजिटल पेमेंटचा पर्याय देण्यात आला आहे.

डिसेंबर २०१९ मध्ये रुपे असणारे डेबिट कार्ड, यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआई/भीम-यूपीआई) आणि यूपीआई क्विक रिस्पॉन्स कोड (क्यूआर कोड) ला इलेक्ट्रॉनिक प्लेटफॉर्म म्हटले आहे.