07 April 2020

News Flash

संयम सुटू देऊ नका!

शहाणासुरता मानला गेलेला तुमच्यातील गुंतवणूकदार आतापर्यंत पूर्णपणे गोंधळून गेला असेल

शहाणासुरता मानला गेलेला तुमच्यातील गुंतवणूकदार आतापर्यंत पूर्णपणे गोंधळून गेला असेल. असे घडलेले नाही, अशी शक्यता फारच कमी. विशेषत: भांडवल बाजाराची सध्याची तऱ्हा पाहता अनेकांची त्रेधातिरपीट होणे स्वाभाविकच. बाजारात निर्देशांकांच्या दोलकाचे वर-खाली हेलकाव्यांनी गुंतवणूकदारांच्या हृदयाच्या ठोक्याशी ताल धरणे हे सद्यस्थितीत अपरिहार्यच.नेमकी परिस्थिती काय आहे, हे अशा वेळी समजवून घेणे खूपच महत्त्वाचे.

एकूणच अस्थिर वातावरणात कोणाही सुज्ञ व्यक्तीने आपल्या गुंतवणूक धोरणाचा फेरविचार करणे स्वाभाविकच आहे. वेळीच विक्री करून नफा गाठीशी बांधून घ्यायला हवा होता, अशी हळहळही मनात असेल. नाही, अजूनही वेळ गेलेली नाही, नुकसान करून घेण्यापेक्षा शक्य तितक्या लवकर या गुंतवणुकीतून बाहेर पडण्याचीही काहींची भावना असेल. जसे बाजाराचा पारा वर चढत असताना खरेदीची घाई केली जाते अगदी त्याप्रमाणेच उद्याची वाट न पाहता विक्रीचा सपाटा मग सुरू होतो.
खरे तर बाजारात ‘भय’ आणि ‘लोभ’ या दरम्यानचा जो अवकाश आहे तो अनेकांसाठी पसा कमावण्याची संधी असते. या भावनेला काही लोक हे स्थितप्रज्ञता अथवा जडत्व, काहींच्या मते तो नशिबाचा खेळ असतो. पण नेमके विचाराल तर तो ‘धीर’, ‘संयम’ असा अजोड गुण आहे. तर हा गुण प्रत्येकात असतोच असे नाही, पण अशा अवघड स्थितीत त्याची जोपासना होते.
सध्या आपला बाजार निश्चितच जगभरातून उडत येणाऱ्या माहितीच्या माऱ्याने हेलकावे घेताना दिसत आहे. बाजारातील या अस्थिरतेला एक अटळ अपरिहार्यता म्हणून आपण मान्यच केले पाहिजे. ठरावीक वर्षांगणिक बाजारात हे असे अतक्र्य उल्हासाचे अथवा अगम्य जळफळाटाचे पडसाद उमटतच असतात. बाजारक्रमाचा त्यांना एक अभिन्न हिस्सा समजून आपल्या उद्दिष्टाच्या दिशेने आगेकूच सुरू ठेवणे आपल्या हाती आहेच.
तरीही जर ताजी अस्थिरता तुमचे चित्त विचलित करणारी ठरली असेल, तर अशा वातावरणात स्थिर रूपात परतावा देणाऱ्या अन्य गुंतवणूक पर्यायांचा विचार जरूर करता येईल. तुमच्या गुंतवणूक सल्लागारासाठी या संबंधाने मसलत करता येईल. म्युच्युअल फंड हा मुळातच अस्थिरतारोधक पर्याय आहे, जो बाजार वरच्या दिशेने सरकत असताना तुम्हाला त्याचे लाभ देईलच, पण बाजाराचे मंदीचे आवर्तनही तुमच्यासाठी उपकारक ठरेल अशी किमया तो साधतो. अर्थात पूर्वअट एकच गुंतवणूक दीर्घ मुदतीत व न डगमगता संयतपणे सुरू ठेवली पाहिजे. शिवाय हे इक्विटी (समभाग संलग्न) फंड असल्याने मिळणारा परतावाही पूर्णपणे करमुक्त असतो.
आणखी एक, आपण भारतातील गुंतवणूकदार आहोत हे विसरता कामा नये. मंदीने काळवंडलेल्या जगातील तेजपुंज केंद्र असलेल्या देशाचे गुंतवणूकदार आहोत. आपल्या देशासाठी एक असे पर्व आहे, जेथून पुढील काही वर्षांत अमर्याद वाढच संभवते. आपल्या आसपासचे जग हे मंदीचा मुकाबला करीत असताना, आपल्याकडून साधली जाणारी कोणतीही मजल वाढसदृशच ठरेल. त्यामुळे सध्या आपण कोणत्याही पायरीवर का असेनात, येथून पुढे वरची शिडी चढली जाईल, असा हा काळ निश्चितच आहे. एका सामाजिक-आíथक स्तरातून पुढच्या स्तरात तुमचे संक्रमणही अपरिहार्य दिसत आहे. गरज आहे ती संतुलित गुंतवणूक भांडार (पोर्टफोलियो) बनवण्याची व संयमाने पाऊल पुढे सरकवण्याची!
बाजार अस्थिरतेची मुख्य कारणे
१. उभरत्या बाजारव्यवस्थांमधील भयकंप : उभरत्या अर्थव्यवस्था आणि जिनसांचे निर्माते असलेल्या देशांपुढील संकट हे आज बाजाराच्या अस्थिरतेचे मूळ व मुख्य केंद्र आहे. अनेक प्रमुख जिनसांच्या किमतीतील तीव्र स्वरूपाच्या उताराने हादरे निर्माण केले आणि परिणामी चीनच्या बाजारातील भूकंपाची कंपने जगभरच्या बाजारात उमटली. गेल्या एका वर्षांत खनिज तेलाच्या किमती ६१ टक्क्यांनी गडगडल्या. परिणामी त्यामुळे ब्राझील, रशिया, अर्जेटिना आणि ओपेकमधील तेल उत्पादक देशांच्या अर्थव्यवस्थाच डळमळीत झाल्या आहेत.

२. चीनमधील अर्थमंदी : जागतिक स्तरावरून मागणी घटली आणि चीनच्या निर्यात व आयातीला याचा जबर फटका बसला. गेल्या महिन्यातील उपलब्ध आकडेवारीनुसार, चीनची निर्यात ही जवळपास आठ टक्क्यांनी डळमळली आहे. तर पच्रेसिंग मॅनेजर इंडेक्स (पीएमआय) सहा वर्षांपूर्वीच्या नीचांक पातळीवर गेला आहे. निर्यातप्रधान अर्थव्यवस्थेकडून देशांतर्गत मागणीला चालना देणारे अर्थव्यवस्थेकडे चीनने अलीकडे प्रयत्नपूर्वक सुरू केलेले संक्रमणही फलदायी ठरलेले नाही. किंबहुना चीनला त्याच्या चलनाच्या बचावासाठी आपल्या ३.६ लाख कोटी डॉलरच्या महाकाय विदेशी चलन गंगाजळीला ४०० अब्ज डॉलरचे भोक पाडणे भाग पडले. चालू खात्यावर प्रचंड वरकड असलेल्या देशाबाबत हे असे घडणे विस्मयकारकच !

३. चलन अवमूल्यन : चीन आणि युरोझोन राष्ट्रांतील अर्थव्यवस्थांचे संथावलेपण, हे जगभरात एकूणच तेल-धातूदींच्या घसरलेल्या किमती पाहता या जिनसांच्या निर्यातदार देशांच्या अर्थगतीबाबत प्रश्न निर्माण करणारे ठरले. चालू २०१५ वर्षांत ब्राझील, रशिया, अर्जेटिना आणि मलेशिया या देशांचे चलनांचे विनिमय मूल्य २० टक्क्यांहून अधिक गडगडले आहे. हे देश २००८ सालासारखीच बाजारात पडझड अनुभवत असून, त्यांचे प्रमुख निर्देशांक हे वर्षांतील उच्चांक पातळीपासून २५ टक्के व अधिक घसरले आहेत.

४. विदेशी गुंतवणूकदारांचे पलायन : तेल उत्पादक देशांकडे प्रचंड पसा होता, जो जगभरातील रोखे व समभाग बाजारांतील तेजीचा इंधन पुरवीत होता. परंतु सद्य मलूल वातावरणापायी दिग्गज विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी गेल्या वर्षभरात उभरत्या अर्थव्यवस्थांच्या बाजारातून तब्बल १ लाख कोटी डॉलरची गुंतवणूक काढून घेतली आहे.

५. अमेरिकेतील शेलचा फुफाटा : आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीतील तीव्र घसरणीला आणखी एक पलू आहे. अमेरिकेतील शेल गॅस हा नवा इंधन स्रोत त्याला कारणीभूत आहे. अत्यंत खर्चीक अशा त्याच्या उत्पादन प्रक्रियेसाठी पसा हा अमेरिकेच्या जंक बॉण्ड्स (अत्यंत उच्च व्याजदराचे रोखे) बाजारपेठांकडून पुरविला गेला आहे. एका ढोबळ अंदाजानुसार शेल उत्पादक कंपन्या या रोखेधारकांना ३३० अब्ज डॉलर इतके देणे लागतात. आता अमेरिकेचे खनिज तेल- नायमेक्सही प्रति बॅरल ४० डॉलरखाली गेले असल्याने, त्याने अमेरिकेच्या या उच्च परताव्याच्या रोखे बाजारातही तणाव निर्माण केला. गेल्या पाच महिन्यांत रोख्यांच्या किमती १० टक्क्यांनी उतरल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2015 6:48 am

Web Title: dont lose your patience in current market conditions
टॅग Bse,Business News,Nse
Next Stories
1 स्टेट बँकेत दोन अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालकांची नेमणूक लवकरच
2 मुंबई निर्देशांकाचा १५ महिन्यांचा नीचांक
3 चीनकडून विकास दर अंदाजात अखेर घट
Just Now!
X