एसबीआय कार्ड या भारतातील अग्रणी क्रेडिट कार्ड दाता संस्थेने भारतातील सर्वात मोठय़ा सात इ-कॉमर्स अग्रणी संस्थांशी भागिदारी केली आहे. ‘सिम्प्लि क्लिक एस बी आय कार्ड’द्वारे खरेदीदारांनी अॅमेझोन इंडिया, बूकमायशो, क्लियरट्रिप, फुड पांडा, लेन्सकार्ट आणि ओला कॅब्ससारख्या देशातील सात महत्वपूर्ण इ-कॉमर्स व्यासपीठावर व्यवहार करता येणार आहे.
याद्वारे ग्राहक त्यांच्या सिंप्लिक्लिक एस बी आय कार्डाच्या खात्याला एस बी आय कार्ड मोबाईल एॅप, वेबसाइट आणि पुल एस एम एस चॅनल सारख्या तांत्रिक पाश्र्वभूमीमार्फत स्वत: सेवा घेऊ शकतात. सिंप्लिक्लिक एस बी आय कार्ड ग्राहकांमार्फत तयार केलेल्या ५ एक्स ऑनलाइन स्पेंड्सना समन्वयित करण्याच्या दृष्टीने वृिध्दगत रिवॉर्ड पॉइंट्स देऊ करणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 22, 2015 7:48 am