लाईफस्टाईल वर्गवारीतील अस्तित्त्व सबळ करताना ईबे इंडिया  घडय़ांकरिता ऑनलाईन वॉच मॉल दाखल केल्याची घोषणा केली. ६५ हजारांहून जास्त एसकेयू आणि मोन्ताईन, स्विस लेजण्ड, वेकीन, रॉयल लंडन, बेन शर्मन अशा २६आंतरराष्ट्रीय ब्रँड्सची घडय़ाळे उपलब्ध करुन देणाऱ्या या वॉच मॉलच्या माध्यमातून ईबेने ग्राहकांना २०० हून अधिक जागतिक आणि स्थानिक ब्रँड्स उपलब्ध करुन दिले.
भारतातील घडय़ाळ उद्योगाचे एकूण मूल्य अंदाजे ८३.४ कोटी डॉलर इतके वर्तवण्यात आले आहे आणि त्यात दरवर्षी १० टक्के दराने वाढ होत आहे. ई-कॉमर्स उद्योगाची भरभराट होत असताना घडय़ाळांच्या ऑनलाईन बाजारपेठेचे मूल्य ३.२ कोटी डॉलर्स इतके नोंदवण्यात आले आहे आणि त्यात वार्षकि तत्त्वावर ३५ टक्के दराने वाढ होते आहे. घडय़ाळाच्या एकूण बाजारपेठेमधील २१ टक्के हिश्यासह ईबे इंडिया या क्षेत्रात आघाडीच्या स्थानावर आहे.
ईबे इंडियावर होणाऱ्या घडय़ाळयांच्या एकूण विक्रीमध्ये १४ टक्के वाटा महाराष्ट्रमधील खरेदीदारांचा आहे. यातील बहुतेक खरेदीदार क्रोनोग्राफ घड्याळे विकत घेणे पसंत करतात असे दिसून आले आहे.