18 January 2019

News Flash

कागद उद्योगक्षेत्रात पर्यावरणस्नेही बदल

संश्लेषित कागद (सिंथेटिक पेपर) हा प्लास्टिक घटकांपासून बनविण्यात येईल.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

‘संश्लेषित कागदा’चा नव पर्याय

आजच्या काळात पर्यावरण संवर्धन आणि अक्षय्य उपायांची कास धरली जात असताना, कागदाच्या जपून वापरावरही भर दिला जात आहे. मुख्यत: प्लास्टिक बंदीनंतर पॅकेजिंग, बांधणी, लेबलिंग आणि टॅगिंगसारख्या वापरात होणाऱ्या बदलला किरकोळ विक्री क्षेत्र कशाप्रकारे सामोरे जाणार ही समस्या असताना, यावर नव्या प्रकारच्या संश्लेषित अर्थात कृत्रिम कागद समर्पक पर्याय बनून पुढे आला आहे.

कृत्रिम कागद हा पुनप्र्रक्रिया करण्याजोगा नसला, तरी त्याची निर्मिती प्रक्रिया ही मोठय़ा प्रमाणावर पर्यावरण-स्नेही आहे. पारंपरिक कागदाप्रमाणे या कागदाच्या निर्मितीत झाडांची कत्तल करण्याची आवश्यकता नसते. याची निर्मिती भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेल्या चुनखडीपासून करण्यात येते. जल संवर्धनातही हा कागद उपयुक्त आहे, तसेच वायू प्रदूषणाला प्रतिबंध करतो. तसेच याची निर्मिती करण्यासाठी कागदाप्रमाणे अ‍ॅसिड, अल्कली किंवा लिचिंग एजंटची आवश्यकता भासत नाही. त्याशिवाय पारंपरिक कागदाच्या तुलनेत तो हलका आहे, असे कॉस्मो फिल्म लिमिटेडच्या उत्पादन प्रमुखांनी सांगितले. कॉस्मो फिल्म्स लिमिटेड, ही बायक्झीयली ओरियंटेड पॉलिप्रोपलिन (बीओपीपी) फिल्म्सची जगातली सर्वात मोठी निर्माती कंपनी आहे.

ही कंपनी लवकरच काही वापरांमध्ये सिंथेटिक कागदाच्या प्रगत आवृत्तीचा समावेश करणार आहे. हा कागद नावाप्रमाणे नैसर्गिक घटकांपासून बनलेला नाही, तसेच यातील बीओपीपी फिल्म प्रत्यक्षात कागदाप्रमाणे काम करेल. ही फिल्म सर्व वापरातील कागदाची जागा घेईल. तो फाटणार नाही तसेच कोणत्याही हवामानात टिकून राहील.

बहुपयोगी टिकाऊ वापर शक्य

संश्लेषित कागद (सिंथेटिक पेपर) हा प्लास्टिक घटकांपासून बनविण्यात येईल. जो पाणी, तेल, रसायन आणि डागांना प्रतिबंध करेल. आपल्याला विशेषत: दैनंदिन आयुष्यात टिकाऊपणा, संरक्षक वापराची गरज आणि कागदाचा वारंवार उपयोग करावा लागतो अशा वापरांमध्ये सिंथेटिक कागद वापरण्यात येईल. व्हिजिटिंग आणि आयडी कार्डच्या वापराकरिता तसेच गारमेंट टॅग्स आणि मार्केटिंग कोलॅटरल्स उदा. पोस्टर्स, बॅनर्स इत्यादीसाठी या कागदाचा वापर उपयुक्त ठरेल. महत्त्वाचे दस्तऐवज जसे मेडिकल रिपोर्ट्स, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि जमिनीची कागदपत्रे, सूचना पुस्तिका, सिंथेटिक पेपरवर प्रिंट करण्यात येतात. या कागदाचा आणखी एक महत्त्वाचा वापर म्हणजे नकाशे, फ्लिप चार्ट यासारखी टिकाऊ शैक्षणिक सामग्री तसेच कॅलेंडर्स इत्यादीदेखील याच कागदांवर मुद्रित केले जाऊ शकतील, असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.

 

First Published on April 13, 2018 2:20 am

Web Title: eco friendly changes in paper industry