04 December 2020

News Flash

अर्थ संक्षिप्त

वैविध्यपूर्ण उत्पादने असलेल्या केविनकेयरने केव्हिन्स फ्रुट

केविनकेयर दुग्धजन्य खाद्यपदार्थ निर्मितीत
मुंबई : वैविध्यपूर्ण उत्पादने असलेल्या केविनकेयरने केव्हिन्स फ्रुट मिल्कशेकच्या परिचयाची घोषणा केली. हे भारतातले पहिले ‘रेडी टू सव्‍‌र्ह’ फळे आणि दुग्धजन्य पदार्थावर आधारित पेय असून यामध्ये दुध, मध, फळे यांचा अंश आहे. फळांमध्ये आंबा, सफरचंद आणि पेरु यांची चव समाविष्ट आहे. केविन्स फ्रुट मिल्कशेकमध्ये थेट शेतकऱ्यांकडून मिळणारे दुध आहे. या व्यतिरिक्त मध आणि फळांची दुधाला मिळालेली जोड आहे. या नव्या उत्पादनाची किंमत २५ रुपये आहे. या नव्या व्यवसायात शिरताना केविनकेयरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सी. के. रंगनाथन म्हणाले, केविनकेयरमध्ये आम्ही नेहमीच सर्वोत्तम गुणवत्ता आणि माफक दरांमध्ये ग्राहकांना आगळीवेगळी उत्पादने देण्याचा प्रयत्न करीत असतो. आम्हाला केविन्स फ्रुट मिल्कशेक सादर करताना अतिशय गर्व होत आहे, हे भारतातील पहिले डेयरी उत्पादन आहे जे फळे, दुध आणि मधाच्या गुणविशेषांसोबत येते. हे अतिशय वेगळे उत्पादन असून कॅल्शियम, प्रोटीन्स आणि व्हिटामीन्सचा उत्तम स्त्रोत आहे असे म्हणता येईल. हे पेय दररोज पिता येऊ शकते. केविनकेयर एॅंबियंट डेयरी व्यापारासाठी वचनबध्द असून कंपनीने मिल्कशेक्समध्ये आधीच ४० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे आणि या व्यतिरिक्त फ्रुट मिल्कशेक आणि इतर अतिरिक्त उत्पादनांसाठी ३० कोटी रुपयांची आणखी तरतुद केली आहे. कंपनी तीन महिन्यांमध्ये दक्षिणेतील तीन राज्ये पूर्ण करण्याचा आणि या आíथक वर्षांच्या अखेपर्यंत भारतभर पोहोचण्याचा विचार करीत आहे.

शुगरफ्रीची राजदूत परिणिती चोपडा
मुंबई : शुगर फ्री, शुगर सबसिट्यूट श्रेणीतील भारतातील सर्वात आघाडीच्या कंपनीने परिणिती चोपडाला आपली राजदूत म्हणून जाहीर केले आहे. आपल्या नवीन ब्रॅंड कॅंपेनचा एक भाग म्हणून, परिणिती जीइसी आणि देशातील न्यूज चॅनल्सवर दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये दिसेल. शुगर फ्रीने स्वत:ला नवीकृत करण्यासाठी पाऊल उचलले आहे आणि साखरेचे थेट सेवन करण्याचा एक निरोगी विकल्प म्हणून ब्रॅंडला समोर आणले आहे. ब्रॅंडची नवीन ब्रिदवाक्याचा ‘स्मार्टनेसवाला स्विटनेस’’चा उद्देश म्हणजे गोडवा राखत साखर सोडण्याला एक निरोगी विकल्प बनविण्यासाठी ग्राहकांना आकर्षति करणे होय. नवीन एसएफ मोहिमेबद्दल झायडस वेलनेसचे मुख्याधिकारी तरुण अरोरा म्हणाले, आमची नवीन मोहिम अधिक स्मार्ट निवड करण्यावर आधारित आहे. आज, ग्राहकांना अन्नपदार्थ, ग्राहकोपयोगी पदार्थ तसेच आरोग्यामध्ये देखील अनेक विकल्प उपलब्ध आहेत. त्यांच्या आवडीला न सोडून देता चवीची हुशारीने आणि तल्लख निवड करण्यामध्ये शुगर फ्री त्यांना मदत करेल. ‘स्मार्टनेसवाला स्विटनेस’ची संकल्पना स्मार्ट निवड करण्यावर भर देण्याबद्दल आहे.
युरोकरिता

मर्सिडिजची ‘स्पोर्ट’
मुंबई : भारतातील आघाडीची आलिशान वाहने बनवणारी कंपनी असणाऱ्या मर्सिडिज बेंझने युरोपिअन फुटबॉल महासंघाच्या (युएफा) युरो चषक फुटबॉल स्पर्धा २०१६ चा जल्लोष साजरा करण्यासाठी तिच्या सीएलए आणि जीएलए या वाहनांची ‘स्पोर्ट एडिशन’ भारतात सादर केली. या संपूर्ण ‘स्पोर्ट एडिशन’मध्ये चित्ताकर्षक बा अक्सेसरीज आहेत; यामुळे सीएलए आणि जीएल या वाहनांचे खास सादरीकरण स्पोर्टी, डायनॅमिक बनले आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय ंसंचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रोलॅण्ड फॉल्गर यांनी ही ‘स्पोर्ट एडिशन’ सादर केली. ते या निमित्ताने म्हणाले की, जर्मन नॅशनल टीम या फुटबॉलच्या जगज्जेत्या संघाचे प्रायोजक आहेत. या तारांकित संघाबरोबरची आमची भागीदारी म्हणजे नेहमी खऱ्या अर्थाने जेत्या असणारयांशी जोडले राहण्याच्या आमच्या विचाराचेच एक द्योतक आहे. सीएलए आणि जीएल या वाहनांची नवी ‘स्पोर्ट एडिशन’ भारतात युएफा युरो २०१६ च्या जल्लोषाचे एक प्रतीक आहे.

अपोलो हॉस्पिटलचा जियो हितकारी मंच
मुंबई : अपोलो लाइफ या आरोग्य आणि हितकारी क्षेत्रामध्ये दक्षिण आशियामधल्या आघाडीच्या संस्थेसोबत जगविख्यात वैद्यक अधिकारी डॉ. दीपक चोपडा, व्यवसाय आणि तंत्रज्ञान तज्ज्ञ पूनाचा माचिया यांनी यासाठी भागीदारी केली आहे. जियोमध्ये अत्याधुनिक युगातील अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यायोगे १.५ दशलक्ष कंपनी आणि व्यक्तिगत एकूण उपयोगकर्त्यांना हितावह सेवा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. यामुळे चुकीच्या जीवनशैलीची निवड केल्यामुळे उद्भवणा-या दीर्घकालीन मधूमेहाच्या जागतिक आव्हानाचे समाधान केले होणार आहे. जियो ही एक व्यक्तिगत मोहिम असेल. ज्यामुळे व्यक्तिगत बदलाला चालना देण्यासाठी मदत केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अनेक प्रसिध्द एॅप्स आणि उपकरणे केवळ वेलिबग किंवा हितावर लक्ष केंद्रीत करताना आढळत असताना जियो आरोग्य आणि वेलनेस दोहोंचे समाधान देणार असून जीवनशैलीतील बदलाला प्रोत्साहन देणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2016 7:26 am

Web Title: economic news
Next Stories
1 ‘पी-नोट्स’ गुंतवणुकीला वेसण!
2 वित्तवर्षांची सुरुवातच सुमार!
3 ‘सेन्सेक्स’ची १२८ अंश गटांगळी!
Just Now!
X