वित्तीय तूट राखण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. याबाबत अर्थसंकल्पाच्या तोंडावर अर्थमंत्र्यांनी तातडीने बोलाविलेली निवडक अर्थतज्ज्ञांची बैठक रद्दही करण्यात आली. सोमवारी प्रत्यक्ष अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री शनिवारी अर्थतज्ज्ञांशी चर्चा करणार होते. दीड तासासाठीच्या या नियोजित बैठकीस अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा व अर्थ मंत्रालयातील ज्येष्ठ अधिकारी हजर राहणार होते. शुक्रवारी आर्थिक पाहणी अहवाल जारी होणार आहे.