|| व्ही. विश्वनंद

बेल्जियममध्ये आयोजित केलेल्या, टुमारोलँड या इलेक्ट्रॉनिक नृत्य संगीताच्या उत्सवात जाण्याच्या विचाराने तुम्ही कधी मोहित झाला आहात का?  किंवा तसाच, मंत्रमुग्ध करणारा उत्तरेकडील प्रकाश पाहण्यासाठी नॉर्वेला जाण्याची तीव्र इच्छा कधी झाली आहे का?

खरे तर ही ठिकाणे युरोपमध्ये आहेत आणि तेथील प्रवास काहीसा महागडाही आहे.  परंतु, आकांक्षा आणि मोह या दोन गोष्टी ते करायला भाग पडतात. आपण जेव्हा या प्रवासाचा विचार करतो तेव्हा आपण कॅल्क्युलेटर काढतो आणि तेथील प्रवास अधिक आनंददायी करण्यासाठी, किती रक्कम महिन्याला साठवता येईल याचा हिशेब करतो.

येथे एक मिथक ‘बस्टर’ आहे.  तुम्ही तुमच्या पैश्याचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करत आहात. तुमची सेवानिवृत्ती, मुलांचे शिक्षण या महत्वाच्या उद्देशाशी तडजोड न करता स्वप्नातील सहलींसाठी जर तुम्ही पुरेशी बचत करत असाल तर तुम्ही तुमचे आर्थिक व्यवस्थापन अगदी योग्य प्रकारे करत आहात.

त्यामुळे आर्थिक अडचणी येणार नाहीत असे मार्ग शोधाल. तुम्ही तुमच्या कुटुंबाचे आर्थिक भवितव्य सुरक्षित करून या सुटय़ांचा अगदी शांततेत आनंद घ्यावा, प्रवासाचे नियोजन नीट करता यावे, यासाठी येथील काही मार्गदर्शक तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. त्यासाठी ‘टर्म इन्शुरन्स’ (मुदतीचा विमा) खरेदी केल्यास, तुमच्या मागे तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक कल्याणाच्या भीतीवर मात करता येते.

अगदी तुमच्यामागेदेखील तुमच्या प्रियजनांचे भविष्य सुरक्षित असल्याची खात्री करण्याचा अधिक प्रभावी आणि स्वस्तातील मार्ग म्हणजे टर्म इन्शुरन्स. पण ते भीतीपोटी खरेदी करू नका. आपल्यापैकी बहुतेक लोक ही उत्पादने भीतीपोटी खरेदी करतात.

खरे म्हणजे ही उत्पादने अभिमानाने विकत घ्यावीत अशी आहेत. आगाऊ तयार असण्याचा अभिमान, आणि तुमच्यामागेही तुमच्या कुटुंबाचे भवितव्य सुरक्षित असल्याचा हा अभिमान. म्हणूनच ते खरेदी करा आणि शांत मनाने जगा!

‘टर्म इन्शुरन्स’चे कार्य कसे चालते? सरासरी ३० वर्षे वयामध्ये दरमहा ६०० रुपयांची बचत सुरू केल्यास  व्यक्तीला १ कोटी रुपयांचे विमा संरक्षण मिळते. ३० वर्षांच्या शेवटी पैसे परत मिळत नसल्यास मृत्यूच्या घटनेत पहिल्या प्रीमियमच्या देय झाल्यानंतर कधीही कुटुंबास १ कोटी रुपये मिळतील.

अशा उत्पादनावर परतावा का मिळत नाही? तुमच्या चारचाकी किंवा दुचाकी विम्यावर तुम्हाला परतावा मिळतो का? अपघाताच्या घटनेमुळे होणारी नुकसान भरपाई करण्यासाठी विमा कंपनीने घेतलेले हे शुल्क आहे. तसेच, टर्म इन्शुरन्स’च्या वार्षिक प्रिमियमचा विचार करावा. जेव्हा विमा कंपनी तुमच्याकडून शुल्क घेते तेव्हा एखाद्या आकस्मित परिस्थितीत तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक निर्भरतेची खात्री करते.

‘टर्म इन्शुरन्स’ घेण्यामागे आणखी काही करणे आहेत का? तर याचे उत्तर होय असेच आहे.

मागील वर्षांत ‘टर्म इन्शुरन्स’ अस्तित्वात नव्हता. त्यामुळे वडिलांनी/ पालकांनी भविष्यासाठी आणि भविष्यास संरक्षण देण्यासाठी अधिक बचत केली. परंतु जेव्हा मृत्यू लवकर ओढवला तेव्हा त्यांच्या सर्व बचत योजना शून्यावर आल्या. मग, अगदी लहानश्या वार्षिक शुल्कामध्ये भविष्याला संरक्षण देणारे एक आर्थिक उत्पादन असणे म्हणजेच सशक्तीकरण नव्हे का ?

‘टर्म प्लॅन्स’ विकत घेतल्यानंतर आपल्या पुढील मोठय़ा सुट्टीचे नियोजन सुरू करा.

माझी पुढील सहल अलास्काला असेल ?

तुमचे काय..

(लेखक मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनीचे उप व्यवस्थापकीय संचालक आहेत.)

‘टर्म इन्शुरन्स’ संरक्षणाचे मूल्य किती असेल? आपण ते कुठे खरेदी करू शकतो? बहुतांश ‘टर्म प्लॅन्स’ हे ऑनलाईन खरेदी करता येतात किंवा विश्वासार्ह जीवन विमा प्रतिनिधींमार्फत खरेदी करता येतात.