सक्तवसुली संचालनालयाने मुंबईतील आघाडीच्या लोढा बिल्डर्सला विदेशातील उपकंपन्या तसेच भागीदार कंपन्यांच्या तपशिलाबाबत विचारणा केली आहे. मेसर्स लोढा डेव्हलपर्स प्रा. लि. व तिच्या विदेशातील उपकंपन्या तसेच भागीदार कंपन्यांमधील गुंतवणुकीचा सविस्तर तपशील व स्थावर मालमत्तेची माहिती सादर करण्यास सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबई विभागाने कंपनीला सांगितले आहे. फेमा कायदा १९९९ च्या कलम ३७ अन्वये कंपनीकडे ही विचारणा करण्यात येत असल्याचे सक्तवसुली संचालनालयाचे मुंबईतील सहायक संचालक आशुतोष कुमार यांनी कंपनीला पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.