सर्वसाधारण विमा क्षेत्रातील खासगी कंपनी ‘एडेल्वाइज टोकियो लाइफ’ने ‘क्रिटिकेअर प्लस’ ही गंभीर आजारांपासून संरक्षण देणारी विमा योजना प्रस्तुत केली. एक कोटी रुपयांपर्यंतचे व्यापक विमाछत्र, वेगवेगळ्या आजारांमध्ये तीन वेळांपर्यंत मल्टि-क्लेम करण्याची सुविधा अशी या नव्या योजनेची वैशिष्टय़े आहेत.

एडेल्वाइज टोकियो लाइफ-क्रिटिकेअर प्लस हा वैयक्तिक, नॉन पार्टििसपेटिंग प्लान असून त्यात सिंगल क्लेम आणि मल्टिक्लेम असे दोन पर्याय विमेदारांना देण्यात आले आहेत. सिंगल क्लेम पर्यायामध्ये गंभीर आजाराच्या सुरुवातीच्या काळात संपूर्ण रक्कम दिली जाते आणि पॉलिसी संपुष्टात येते. तर मल्टिक्लेम या दुसऱ्या पर्यायात क्लेमची रक्कम दिल्यानंतरही विमा संरक्षण चालू राहते. असे विमा संरक्षण असणारी व्यक्ती विम्याच्या मुदत काळात तीन वेळा भरपाईसाठी दावा करू शकते. मात्र प्रत्येक दाव्यामध्ये एक वर्षांचा प्रतीक्षा कालावधी असेल. त्यानंतर पॉलिसी संपुष्टात येईल. पॉलिसीच्या पहिल्या पाच वर्षांमध्ये प्रीमिअमची रक्कम निश्चित असते. त्यानंतर तिचा पुनर्वचिार होऊ शकतो.
विमा बाजारपेठेत एक नवे दालन सुरू करण्याच्या उद्दिष्टाने एडेल्वाइज टोकियो लाइफने क्रिटिकेअर प्लसची योजना सादर केली आहे. सध्या उपलब्ध असणाऱ्या बऱ्याचशा आरोग्य विमा योजना हॉस्पिटलमध्ये झालेल्या खर्चाच्या भरपाईपुरत्या मर्यादित आहेत. परंतु क्रिटिकेअर प्लस बहुविध क्लेम्सच्या माध्यमातून उपचारांसाठी मोठी रक्कम उपलब्ध करून देते. तसेच आजारपणात बुडालेल्या उत्पन्नाचीही भरपाई करते. विमाधारक गंभीर आजारांसाठी वेगवेगळ्या गटांतून तीन वेळा क्लेम करू शकतो. या तीन क्लेम्समध्ये एका वर्षांचा प्रतीक्षा कालावधी असेल. गंभीर आजार रायडर मूळ उत्पादनाशी संबंधित असल्याने मूळ उत्पादन चालू राहिल्यासच या रायडरचा फायदा मिळेल. यामुळे विमाधारकास गंभीर आजारांपासून स्वतंत्र विमाछत्र घेता येते, शिवाय मोठय़ा रकमेचे विमा संरक्षण मिळते.
या विमा योजनेच्या प्रस्तुतीप्रसंगी बोलताना एडेल्वाइज टोकियो लाइफचे व्यवस्थापकीय संचालक दीपक मित्तल म्हणाले की, गेल्या काही वर्षांत गंभीर आजार होण्याच्या शक्यतांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत रुग्णाला केवळ हॉस्पिटलचाच खर्च पेलावा लागत नाही तर त्याचं उत्पन्न बुडतं आणि उपचारांसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करावी लागते. यादरम्यानचा आíथक बोजा खूपच मोठा असतो. क्रिटिकेअर प्लस एक कोटी रुपयांपर्यंत एकरकमी परतावा देते, जेणेकरून गंभीर आजाराचं निदान झाल्यानंतरचे सर्व खर्च रुग्णाला पेलता येतील.