२०१५ मध्ये जगात आणि स्थानिक बाजारात अस्थिरता उमटली. यावेळी ‘लो व्होलॅटिलिटी सोल्यूशन्स’ म्हणजेच कमी अस्थिरता पर्यायांचा उदय हा भारतातील महत्त्वाचा भाग ठरला. यामध्ये स्थिर उत्पन्न आणि समभागांमध्ये यामध्ये जोखीम परतावा असे वर्गीकरण असते.

भांडवली बाजाराकरिता २०१४ हे वर्ष उत्तम ठरले होते आणि गुंतवणुकदारांनी त्यांच्या इक्विटी पोर्टफोलिओमध्ये ३०% हून अधिक वाढ अनुभवली होती. वास्तविक २००८, २०११ व २०१५ ही वर्षे बाजाराकरिता अस्थिर ठरली. अनेक गुंतवणुकदारांना हे सत्य पचविणे कठीण गेले.
आज अनेक गुंतवणुकदार, मग ते किरकोळ असो किंवा आपल्या आधुनिक कौटुंबिक कार्यालयात बसलेले – त्यांचे सातत्याने परतावा कसा मिळेल या दिशेने प्राधान्य असते. त्यांना आपल्या भांडवलाची होणारी धूप/घट नको असते. २०१५ मध्ये जगात आणि स्थानिक बाजारात अस्थिरता उमटली. त्यावेळी ‘लो व्होलॅटिलिटी सोल्यूशन्स’ म्हणजेच कमी अस्थिरता पर्यायांचा उदय हा भारतातील महत्त्वाचा भाग ठरला.
भारतीय पाश्र्वभूमीवर ‘लो व्होलाटीलिटी सोल्यूशन्स’ म्हणजे अशी उत्पादने ज्यामध्ये स्थिर उत्पन्न आणि समभागांमध्ये यामध्ये जोखीम परतावा असे असते. ते समभाग म्युच्युअल फंडच्याविरुद्ध असतात. ते समभागांमध्ये ९० ते १०० टक्क्य़ांपर्यंत असू शकतात. ही उत्पादने आक्रमक, समभाग जोखीमबरोरच ‘डेरिव्हेटीव्हज’ सुरक्षितता किंवा इतर बिगर समभाग मालमत्ता गट म्हणजे सोन्यात बदलून घेतल्यामुळे समभाग सहभाग कमी करून घेतात. परतावा (रिटर्न) देऊ केला जातो तोदेखील बहुदा स्थिर उत्पन्न अधिक ३% असा असतो. परतावा हा समभागाच्या समान असतो. मात्र समभागमूल्यदेखील घसरू शकते.
पारंपरिक समभाग फंडप्रमाणे गुंतवणुकदाराचा अनुभव बाजाराच्या वेळेशी अवलंबून असतो. पोर्टफोलियो हा ५०% बाजार खाली असताना आणि ७५% बाजार वर असताना सहभाग दर्शवू शकतो. त्याचा एकत्रित परतावा हा चक्रकार समभागाच्या तुलनेत लक्षणीय असतो. एखाद्या उत्पादनात ‘लोअर ड्रॉ-डाऊन’ दिसला तर त्याची वर्तणूकदेखील लाभदायक असते. त्यामुळे गुंतवणुकदार घाबरून जात नाही आणि सध्याचे ‘सब-ऑप्टीमल टाईम’ आणि ‘बिल्ड स्टेईंग पॉवर’ हे दीर्घकालीन कामगिरीतील महत्त्वाचे घटक ठरत आहेत.
एकीकडे गुंतवणूकदार हा कमी अस्थिरता असलेल्या पर्यार्याशी संतुलित निधी/फंड आणि मासिक उत्पन्न योजनांनी पारंपरिकरित्या जोडलेला असतो. आज बाजारात अनेक प्रकारचे अत्याधुनिक गुंतवणूक पर्याय सर्वोच्च जोखीम परताव्याच्या ‘पेऑफ’सह उपलब्ध आहेत. विदेशी गुंतवणूकदार संस्थांच्या व्यासपीठावर ‘अ‍ॅबसोल्युट रिटर्न फंड्स’ किंवा ‘एनहान्स्ड इक्विटी फंड्स’ ही फंडांची वर्गवारी उपलब्ध आहे. गेल्या वर्षी या वर्गवारीने लक्षणीय भांडवल आकर्षति केले. चांगल्या प्रतीच्या समभागांमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीच्या स्थितीत मर्यादा राखण्याची क्षमता आहे आणि वैयक्तिक समभागांमध्ये अल्पकालीन स्थिती घेता येते. हे फंड वर ८०-१००% समभाग, खाली २०-४०% पोच देतात. ‘स्ट्रक्चर्ड प्रोडक्ट’ ही लोकप्रिय श्रेणी असून ती समभाग सहभागाची परिभाषित रक्कम (डीफाईन्ड अमाउंट) सोबतच स्पष्ट भांडवल हमीही पुरवते. जर गुंतवणूकदराने उपलब्ध काळात बाजार चांगल्या पद्धतीने समजून घेतला असेल तर ते त्याच्याकरिता प्रभावी ठरते. ‘मल्टी-असेट क्लास’ किंवा ‘असेट अलोकेशन फंड’ हे उपलब्ध असून ते जागतिक स्तरावर लोकप्रिय आहेत. एकत्रित समभागांसोबत संबंध नसलेल्या मालमत्ता – उदाहरणार्थ सोने, स्थिर उत्पन्न योजना हे घसरण लक्षणीय प्रमाणात कमी करतात आणि महागाईला मारक असा खंबीर परतावा देतात.
कमी अस्थिरता पर्यायामध्ये गुंतवणूक करण्याआधी या उत्पादनाचे काळजीपूर्वक आणि योग्यरीतीने मुल्यांकन करणे आवश्यक आहे. प्रामुख्याने हे उत्पादन कोणत्या प्रकारचे समभागांमध्ये येते आणि वापरण्यात येणारी ‘इक्विटी अलोकेशन’ पद्धती पाहिल्या पाहिजेत. उत्पादन कशाप्रकारची जोखीम देते आहे हे समजून घेतले पाहिजे. कारण सर्व पर्यायालाही जोखीम असतेच. ती कमी कशी करता येईल ते पाहिले पाहिजे.
एक वर्षांच्या कालावधीत ऐतिहासिक ‘ट्रॅक रेकॉर्ड’चे मुल्यांकन करणे महत्त्वाचे ठरते. हे मुल्यांकन केवळ परतावा किंवा ‘ड्रॉडाऊन’च्या प्रमाणात नसेल तर बाजारस्थिती दरम्यान निधी व्यवस्थापकाने कोणती स्थिती राखली आहे ते महत्त्वाचे आहे. त्याचवेळी कमी अस्थिरता पर्याय पोर्टफोलियोमागचा हेतू लक्षात ठेवावा. भांडवली बाजारातील समभागासोबत त्यांची तुलना करण्याची लालसा कमी होते.
कमी अस्थिरता पर्यायांपासून बाजारात सकारात्मक परतावा मिळतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कमी अस्थिरता देणारे पर्याय आणि स्थिर उत्पन्न किंवा दर महिन्याला सकारात्मक परतावा पुरवठा यांची गल्लत होऊ न देणे. बरेचदा एका महिन्याला तोटा न होण्याची हमी दिली जाते; मात्र छुपे धोके समजून घेतले जात नाहीत. या पर्यायात काही प्रमाणात जोखीम निश्चित आहे; मात्र विस्तारित कालावधीत ‘ड्रॉडाऊन’ तो धोका कमी करतो.
जगभरात अत्याधुनिक संस्था आणि कौटुंबिक कार्यालये कमी अस्थिरता पर्याय निवडतात. कारण त्यापासून सातत्याने फायदे मिळत असतात. भारतातील अस्थिर परिस्थिती योग्यरितीने लक्षात घेतल्यास आणि काळजीपूर्वक निवड केल्यास ही संधी गुंतवणूकदारांच्या प्रमुख पोर्टफोलियोतील महत्त्वाचा भाग निश्चितच ठरू शकते.
लेखिका एडलवाइज ग्रुप कंपनीतील फोरफ्रंट कॅपिटलच्या व्यवसाय प्रमुख आणि मालमत्ता व्यवस्थापक आहेत.