X
निवडणूक निकाल २०१७

गाडी एक कामं अनेक! सामान आणि प्रवासी वाहतुकीसोबत विद्युतनिर्मितीही…

एकाच गाडीचा वापर करून तुम्ही अनेक कामंही करू शकता

आपला व्यवसाय मोठा करणं, तो नावारूपाला आणणं काही साधी गोष्ट नाही. कित्येक महिन्यांची मेहनत, पैशांची गुंतवणूक असतेच पण व्यवसाय उभा करायचा म्हणजे घामही गाळावा लागतो. व्यवसाय छोटा असो की मोठा पण जोपर्यंत योग्य ती मदत मिळत नाही तोपर्यंत तो मोठा करणं अशक्य आहे. व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल आणि इतर साम्रगीची जोडणी करणं अशा अनेक समस्यांना लघु उद्योजकांना सामोरं जावं लागतं, ही अडचण मोठ्या उद्योगांबाबत येत नाही कारण त्यांच्या व्यवसायचा अवाका मोठा असतो. त्यांची गुंतवणूक मोठी असते, कच्चा मालाच्या पुरवठा करणारी वेगळी साखळी असते. त्यामुळे व्यवसायात सर्वात जास्त अडचणी येतात त्या लघुउद्योजकांना. म्हणूनच योग्य ती मदत मिळाल्याशिवाय व्यवसायाचा निभाव लागणं अशक्य आहे.

त्यामुळे व्यवसायासाठी माल वाहून आणण्यासाठी एक छोट्या वाहनाची गरज तर असतेच ना! तेव्हा लघुउद्योजक अशावेळी माल वाहतूक करण्यासाठी छोटीशी गाडी, लहान ट्रक किंवा टेम्पो विकत घेतो. पण नेमकी अडचण अशी येते की वैयक्तिक कारणासाठी आपण काही ती गाडी वापरू शकत नाही. तेव्हा वैयक्तिक कारणासाठी दुसरी एखादी गाडी विकत घ्यावी लागले. त्याचप्रमाणे मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांची एक वेगळीच समस्या असते. या गाड्यांची बांधणी लोखंडापासून तयार करण्यात आलेली असते. म्हणूनच या गाड्यांचा देखभालीचा खर्चच एवढा असतो की आपल्या खिशाला मोठी कात्री बसते. थोडक्यात काय तर एकापेक्षा अनेक कामांसाठी उपयोगी पडणारी गाडी अजून तरी आली नाही.

पण तुमची ही गैरसोय लवकरच कमी होणार आहे कारण आयशर पोलारिसनं ‘मल्टीक्स‘ ही मल्टीपर्पज गाडी लाँच केलीये. या थ्री इन वन गाडीत पाच जणांचं कुटुंब आरामात बसू शकतं. त्याचप्रमाणे तुमच्या सामानासाठीही या गाडीत मुबलक जागा आहे. एवढंच नाही तर या गाडीतून ३ किलोवॅटपर्यंत विद्युत निर्मितीही होऊ शकते. जी तुमचं घर प्रकाशमान करण्यासाठी पुरेशी आहे. त्याचप्रमाणे या विजेचा उपयोग तुम्ही शेतीकामासाठी आणि इतर यंत्र सुरु करण्यासाठी करू शकता.

फक्त तीन मिनिटांत तुम्ही ‘मल्टिक्स’चं पाच जण बसू शकतील अशा प्रवासी गाडीत किंवा मालवाहतूक करणाऱ्या टुसीटर गाडीत रुपांतर करू शकता. यात केबिन स्पेस, रोबस्ट इनर फ्रेम, प्रो राईड यासारखे सेफ्टी फीचर्सदेखील आहेत. यामुळे तुमचा प्रवास सुखाचा होऊ शकतो. आपल्या चुकांपासून धडा घेत जो योग्य निर्णय घेतो तोच उत्तम व्यावसायिक होऊ शकतो. अनेकदा काही व्यावसायिक मालवाहतूक करणाऱ्या गाडीच्या देखभालीवर होणारा खर्च काढण्यासाठी निष्कृष्ट दर्जाचा माल खरेदी करतो. तेव्हा मल्टिक्सने तुमची ही समस्या सोडवली आहे. प्रतिलीटर २७.४५ किलोमीटरचा मायलेज ही गाडी देते. त्यामुळे इंधनचा खर्च वाचतो. दुसरं म्हणजे या गाडीची बॉडी फेक्सिटफपासून बनवली आहे. त्यामुळे गंजण्याचा प्रश्नही येत नाही आणि देखभालीचा खर्चही कमी होतो. तिसरं म्हणजे ही पार्क करण्यासही फार जागा लागत नाही. तेव्हा पैसे वाचतात, गाडी स्टाईलिशही दिसते आणि एकाच गाडीचा वापर करून तुम्ही अनेक कामंही करू शकता.

हजारो ग्राहकांनी मल्टिक्स वापरायला सुरूवात केली आहे आणि याचा त्यांना चांगला फायदाही होत आहे. डाऊन पेमेंटवर ही गाडी उपलब्ध आहे.

आयशर पोलारिस ‘मल्टीक्स’बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

First Published on: August 21, 2017 12:25 pm
  • Tags: Eicher Polaris,
  • Outbrain