News Flash

प्रचंड स्पर्धेच्या मुखनिगा बाजारपेठेत ‘एल्डर’चा पुनप्र्रवेश

एल्डर फार्मास्युटिकल्सने आपल्या तंबाखूचे व्यसन असलेल्यांच्या मुखनिगेचे प्रसिद्ध उत्पादन एएमपीएम माऊथवॉश हे नव्या रूपात सादर करून या प्रचंड स्पर्धेच्या बाजारक्षेत्रात पुन्हा उडी घेतली आहे.

| October 16, 2014 02:50 am

एल्डर फार्मास्युटिकल्सने आपल्या तंबाखूचे व्यसन असलेल्यांच्या मुखनिगेचे प्रसिद्ध उत्पादन एएमपीएम माऊथवॉश हे नव्या रूपात सादर करून या प्रचंड स्पर्धेच्या बाजारक्षेत्रात पुन्हा उडी घेतली आहे.
टोरेन्ट फार्मा या कंपनीला आपल्या महत्त्वाच्या नाममुद्रांच्या विक्रीनंतर एल्डर फार्माने मल्टि-व्हिटॅमिन आणि त्वचेच्या निगेच्या क्षेत्रात नवीन उत्पादने सादर करून बाजारपेठेतील आगेकूच कायम ठेवली असून, २०१७ पर्यंत १००० कोटी रुपयांच्या उलाढालीचे लक्ष्य निर्धारित केले आहे. त्या दिशेने हे मुखनिगा उत्पादन खूपच उपयुक्त ठरेल, असा विश्वास एल्डर फार्माचे व्यवस्थापकीय संचालक आलोक सक्सेना यांनी व्यक्त केला. ग्राहकांच्या वेगवेगळ्या प्रकारांनुसार एएमपीएम हे उत्पादन तीन वेगवेगळ्या श्रेणीत सादर करण्यात आले आहे.
देशातील माऊथवॉश उत्पादनांच्या बाजारपेठेवर सध्या ७० टक्के वाटा स्वत:पाशी ठेवून लिस्टरीन या नाममुद्रेचा वरचष्मा आहे, त्या खालोखाल कोलगेट प्लाक्सचा वाटा १७ टक्क्यांचा असून, एल्डरच्या उत्पादनाकडून ५ ते ७ टक्के बाजारहिस्सा काही वर्षांत कमावला जाईल, अशी सक्सेना यांना आशा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2014 2:50 am

Web Title: elder pharma enters mouthwash category in oral care
Next Stories
1 ‘फ्लिपकार्ट’ला १,००० कोटींचा दंड?
2 आली स्वस्ताई!
3 सेबीचा दणका कायम ; तपापूर्वीच्या प्रकरणात टाटाचे पेंडसे दोषी