करबचतीसाठी वापरात येणारा गुंतवणुकीचा पर्याय इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्स अर्थात ‘ईएलएसएस’ फंडांबाबत विचारला जाणारा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर देण्याच्या दिशेने, अगोदर समभागसंलग्न गुंतवणुकीचा उत्तम धारण कालावधी काय असेल अथवा असावा याचे विश्लेषण करूया.

समभाग गुंतवणूक दीर्घ कालावधीकरिता असते. कारण भांडवली बाजार अल्प कालावधीसाठी अतिशय अस्थिर असू शकते – याचा अर्थ शेअरच्या किमतींमध्ये फार चढ-उतार सारखे होत असतात. तर दीर्घ कालावधीत चांगला आर्थिक पाया असलेल्या (फंडामेंटल्स) कंपन्या बाजी मारू शकतात आणि दीर्घ कालावधीकरिता त्यांचा परतावाही लक्षणीय राहतो. उलट असे म्हटले जाते की, बाजार हा अल्प कालावधीतील सौंदर्य स्पर्धेसारखा तर दीर्घ कालावधीसाठी वजनी काटय़ाप्रमाणे असतो.  गुंतवणुकदारांना मात्र चढ-उतार धास्तावणारे ठरतात आणि प्रसंगी या भीतीतून घेतल्या जाणाऱ्या निर्णयाने पश्चातापाची वेळ येते.

त्यामुळे गुंतवणूकदारांना अतिशय सावध राहणे आवश्यक ठरते. तसेच अल्प कालावधीत भांडवली बाजारामधून वारेमाप पैसा कमावणे हा त्यांच्या गुंतवणुकीचा हेतू असता कामा नये.

तरीच दीर्घ आणि अल्प कालावधीची योग्य व्याख्या कोणती? याचा संबंध उत्पन्न आणि आर्थिक चक्र तसेच बाजारातील भावनिक बदल यांच्याशी असतो. व्यापार हा काही एका ठरावीक मार्गाने वाढत नसतो. ही वाढ विविध अंतर्बा कारणांनी अधिक अनियमितपणे जोडलेली असतात – जसे की, हंगाम, नवीन उत्पादनाच्या प्रस्तुतीचे चक्र इत्यादी. परिणामी, जेव्हा अल्प कालावधीसाठी समभागाचे मूल्यांकन करण्याची गरज निर्माण होते, तेव्हा मोठय़ा प्रमाणावर चुका होऊ शकतात. त्यामुळे मुलभूत दृष्टीकोन (फंडामेंटल परस्पेक्टीव्ह)च्या अल्प कालावधीत किंमती अस्थिर होतात.

गुंतवणुकदारांच्या भावनांमध्ये आलेले परिवर्तन हे अस्थिरतेचे फलित आहे. आपण जेव्हा बाजारात तेजी पाहतो, त्यावेळी त्याच समभागासाठी उच्च मूल्यांकन बरे वाटते. मात्र घसरणीच्या काळात किमतीला देखील उतरणीची कळा लागलेली दिसते.

वरील परिस्थिती पाहता दीर्घ मुदतीची समभागातील गुंतवणूक ही वृद्धी चक्र आणि भावनांमुळे फारच अस्थिर असल्याचे दिसते. तसेच इतिहासात डोकावल्यास जेव्हा तुम्ही पाच वर्षांपेक्षा अधिक काळासाठी गुंतवणूक करता— म्हणजे सात ते दहा वर्षांंकरिता, त्यावेळी तुम्ही भाग्यवान ठरू शकता आणि तुम्हाला अल्प कालावधीकरिता चांगला परतावा देखील मिळू शकतो. फक्त तुम्ही सातत्याने बाजाराच्या क्षमतेत सहभागी होऊन दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची गरज आहे.

या संदर्भाच्या साह्यने आपल्याला प्रश्नाचे उत्तरही मिळाले. हे स्पष्ट आहे की, तीन वर्षांंचा लॉक—इन पिरीयड संपल्यानंतर ईएलएसएसमधून बाहेर पडणे पुरेसे नाही. शेवटी ईएलएसएस फंड्स भांडवली बाजारामध्ये गुंतवणूक करतात आणि याला न्याय देण्याच्या दृष्टीने गुंतवणुकदारांची दीर्घ कालावधीकरिता गुंतवणूक करण्यासाठी तयारी राहिली पाहिजे.

हेही लक्षात असू द्यावे की, एकदा लॉक इन कालावधी संपला, ईएलएसएस फंड हे इतर ओपन एंडेड फंडाप्रमाणेच असतात. गुंतवणुकदारांना कधीही पसंतीप्रमाणे रिडीम करणे शक्य असते. त्यासाठीच लॉक—इन कालावधीच्या शेवटी रिडीम करण्याला विशेष शहाणपणाचे नाही.

(लेखक अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी आहेत.)