News Flash

‘ईपीएफओ’मध्ये ११.५५ लाख ग्राहकभर

ऑक्टोबर २०१९ मध्ये ७.३९ नवीन खाती उघडण्यात आली होती,

मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यांमध्ये (ईपीएफओ) ऑक्टोबरमध्ये ११.५५ लाख ग्राहकांची भर पडली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने, २० डिसेंबर रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते ऑक्टोबर २०२० दरम्यान ३९.३३ लाख नवीन खाती उघडली आहेत.

ऑक्टोबर २०१९ मध्ये ७.३९ नवीन खाती उघडण्यात आली होती, तर ऑक्टोबर २०१९ मध्ये उघडलेल्या नवीन खात्यांच्या तुलनेत ऑक्टोबर २०२० मध्ये उघडलेल्या खात्यांची संख्या ५६ टक्के अधिक आहे. उपलब्ध आकडेवारीत, त्या महिन्यात ज्यांनी भविष्य निर्वाह निधीत योगदान दिले अशा सदस्यांचा या समावेश आहे.

संभाव्यत: भारतातील लोकसंख्याशास्त्राच्या स्वरूपामुळे वय वर्षे १८ ते २५ दरम्यानच्या वयोगटातील सदस्यांना नवसदस्य मानून रोजगारनिर्मिती मोजली जाते. राज्य वेतनश्रेणीच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात आणि हरियाणा ही राज्ये रोजगारनिर्मितीत आघाडीवर आहेत. उद्योग क्षेत्रांच्या वर्गवारीनुसार, चालू आर्थिक वर्षांत रोजगारनिर्मितीत ६० टक्के योगदान सेवा क्षेत्रातील उद्योगांचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 1:05 am

Web Title: epfo added 11 55 lakh net subscribers in october 2020 zws 70
Next Stories
1 अर्थव्यवस्था सकारात्मक!
2 व्होडाफोनसंबंधी लवादाच्या निवाडय़ाला भारताकडून आव्हान?
3 निर्देशांक तेजीला ‘आयटी’ची साथ