30 September 2020

News Flash

‘इक्विटी फंडां’ना ओहोटी; मार्चमध्ये दोन वर्षांतील सर्वाधिक निधीचा निचरा

आर्थिक वर्षांच्या शेवटच्या महिन्यात भांडवली बाजाराने गुंतवणूकदारांना परताव्याचा प्रसाद दिला

| April 9, 2016 03:42 am

आर्थिक वर्षांच्या शेवटच्या महिन्यात भांडवली बाजाराने गुंतवणूकदारांना परताव्याचा प्रसाद दिला असला तरी समभागसंलग्न (इक्विटी) म्युच्युअल फंडांना मार्चमध्ये मात्र कमालीची ओहोटी लागली आहे. एकटय़ा मार्च २०१६मध्ये इक्विटी फंडांमधून १,३७० कोटी रुपयांचा निधी बाहेर गेला आहे.
मार्च महिन्यात सेन्सेक्समध्ये १० टक्केवाढ झाली आहे. जानेवारी २०१२ नंतरचा हा मुंबई निर्देशांकाची ही सर्वोत्तम मासिक वाढ राहिली आहे. मात्र मार्चमधील समभाग निगडित फंडातील ऱ्हास हा गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक ठरला आहे. वरच्या टप्प्यावर पोहोचलेल्या निर्देशांकात नफेखोरीमुळे हे घडले आहे.
मार्च २०१६अखेर संपलेल्या एकूण आर्थिक वर्षांत समभाग निगडित म्युच्युअल फंडांमध्ये ७४,०२४ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. तर यापूर्वी मार्च २०१४ मध्ये समभाग निगडित फंडांमधून १,९३५ कोटी रुपये काढून घेण्यात आले होते.
देशातील ४० म्युच्युअल फंड घराण्यांचे नेतृत्व करणाऱ्या ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ (अ‍ॅम्फी) ने दिलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारीमध्ये समभाग निगडित म्युच्युअल फंडांमध्ये २,५२२ कोटी रुपये तर जानेवारीत २,९१४ कोटी रुपये गुंतविण्यात आले होते.
डिसेंबर २०१५ मध्ये समभाग निगडित फंडांमध्ये ३,६४४ कोटी रुपये निधी होता. तर एकूण २०१५ मध्ये मासिक सरासरी ७,५५० कोटी रुपयांची गुंतवणूक होती. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि रिझव्‍‌र्ह बँकेच्या संभाव्य व्याजदर कपातीच्या पाश्र्वभूमीवर मार्चमधील फंड घसरण कल दिसल्याचे बजाज कॅपिटलच्या म्युच्युअल फंड विभागाचे राष्ट्रीय प्रमुख आणि वरिष्ठ उपाध्यक्ष अंजनेय गौतम यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 3:02 am

Web Title: equity mutual funds
Next Stories
1 आगामी वर्षांसाठी विक्रीच्या अंदाजात कपात
2 भांडवली बाजारात संमिश्र हालचाल; सेन्सेक्समध्ये वाढ; तर निफ्टीत घसरण
3 मुंबईच्या यजमानपदाखाली ‘ब्रिक्स सिटी’ परिषद
Just Now!
X