24 November 2017

News Flash

‘एस्सार ऑइल यूके’ची १,६०० कोटींची गुंतवणूक

एसार ऑइल (यूके) लिमिटेडने १,६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे.

व्यापार प्रतिनिधी, मुंबई | Updated: September 9, 2017 3:56 AM

एसार ऑइल (यूके) लिमिटेडने १,६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे.

इंधन उत्पादन वाढण्याचा कंपनीला विश्वास

‘स्टॅन्लो रिफायनरी’ची मालकी असलेल्या एसार ऑइल (यूके) लिमिटेडने १,६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे.

या गुंतवणुकीमुळे कंपनीचे इंधन उत्पादन सध्याच्या ६८ दशलक्ष बॅरलवरून ७५ दशलक्ष बॅरलपर्यंत वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तसेच यामुळे इंधन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढेल, असा दावाही करण्यात आला आहे.

प्रमुख विमान कंपन्यांसाठी थेट इंधनपुरवठा करण्याच्या क्षेत्रात कंपनीने नुकताच प्रवेश केला आहे.

कंपनीने मार्च २०१७ अखेरचे वित्तीय निष्कर्ष नुकतेच जाहीर केले. कंपनीने गेल्या वित्त वर्षांत ४.९२ अब्ज डॉलरचे उत्पन्न नोंदविले आहे. कंपनीची निव्वळ मालमत्ता ९८१ दशलक्ष डॉलर झाली आहे.

ब्रिटनच्या रस्ते वाहतुकीसाठी असलेल्या इंधनाच्या मागणीपैकी १६% मागणी पूर्ण करणाऱ्या रिफायनरीमध्ये ९.०९ एमएमटी खनिज तेलावर कंपनीने प्रक्रिया केली आहे. आधीच्या वर्षांतील ८.९७ एमएमटीच्या तुलनेत त्यात १.३ टक्के वाढ झाली आहे.

कंपनीच्या कामगिरीबद्दल एस्सार ऑइल (यूके)चे बिगरकार्यकारी अध्यक्ष प्रशांत रुइया यांनी सांगितले की, स्टॅन्लो रिफायनरीमध्ये आम्ही करीत असलेल्या मोठय़ा गुंतवणुकीमुळे उत्पन्नामध्ये आणखी वाढ होईल. त्यासाठी गेली सहा वर्षे आम्ही या व्यवसायाच्या पुनरुज्जीवनासाठी केलेल्या कठोर प्रयत्नांचा फायदा होईल. तेल व वायू उद्योगात गुंतवणूक कायम राखण्याची एस्सारची बांधिलकीही यातून अधोरेखित होईल.

एस्सार ऑइल (यूके) लिमिटेड ही एस्सार एनर्जी लिमिटेडची उपकंपनी आहे. ब्रिटनमधील लिव्हरपूरलजवळ मर्सी एस्टय़ुरीच्या दक्षिण भागाकडे कंपनीच्या मालकीची स्टॅन्लो रिफायनरी असून ती कंपनीमार्फतच चालवली जाते.

First Published on September 9, 2017 3:56 am

Web Title: essar oil uk to invest rs 1600 cr to expand refining capacity
टॅग Essar Oil Uk