यंदाचा अर्थसंकल्प हा स्वप्नवत भासणाऱ्या अर्थसंकल्पापकी एक असेल. समभाग बाजारपेठांना अर्थसंकल्पामधील संभाव्य सुधारणांकडून अपेक्षा आहेत.

देशातील थेट विदेशी गुंतवणूक व विदेशी संस्थागत गुंतवणुकीबाबत आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदारांचा आत्मविश्वास टिकवून ठेवणे गरजेचे आहे. वस्तू व सेवा कराकरता निश्चित तारखांशी किंवा ‘गार’शी बांधिलकी राखण्याची गुंतवणूकदारांची अपेक्षा आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात ‘मेक इन इंडिया’च्या विविध पलूंवर अधिक भर देण्याची अपेक्षा करता येईल. जसे – कापड तयार कपडे, विद्युत उपकरण बाजारपेठ इत्यादींमध्ये हे अधिक प्रमाणात दिसून येऊ शकेल. मूळ प्राप्तीकर वजावट मर्यादा जी वार्षिक सध्या २.५ लाख रुपये आहे त्यात २० ते ३० टक्के वाढ केली तर पगारातील सूट वाढून या मंडळींना खूष ठेवून त्यांचे उत्पन्न वाढवण्याची किमया सरकारला करता येणे शक्य आहे. परवडणारी घरे किंवा मध्यम वर्गाला परवडतील अशी घरे निर्माण करण्यावर अधिक जोर देता येईल.
भांडवली बाजारातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी गुंतवणूक अधिकाधिक आकर्षक करणे महत्त्वाचे आहे. लाभांश वितरण कर (डिव्हिडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स) काढून टाकणे किंवा लाभ कमाविणाऱ्या कंपन्या, उद्योगांवर कमीत कमी भार लादून किरकोळ गुंतवणूकदारांचा या क्षेत्रातील सहभाग वाढविण्यावर भर दिला जावा. समभाग गुंतवणुकीपकी ८० टक्के गुंतवणूक विदेशी गुंतवणूकदारांकडे आहे किंवा प्रवर्तकांकडे तरी. २० टक्क्यांहून कमी फायदा आपल्याला होत आहे.
आशिष सौमया,
मुख्य कार्यकारी अधिकारी, मोतीलाल ओसवाल असेट मॅनेजमेन्ट कंपनी.