25 September 2020

News Flash

अर्थव्यवस्थेच्या गतिमानतेसाठी सरकारकडून सर्व प्रयत्न – निती आयोग

मागील पाच वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था सरासरी ७.५ टक्के दराने वाढत आली आहे

| September 19, 2019 03:27 am

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा उच्च विकासपथावर आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत आणि पुढेही ते सुरू राहतील, असे निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी बुधवारी येथे प्रतिपादन केले.

मागील पाच वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था सरासरी ७.५ टक्के दराने वाढत आली आहे. त्यानंतर ही वृद्धीपथ आर्थिक वर्ष २०१९-२० च्या पहिल्या तिमाहीत अकस्मात ५ टक्क्यांवर घरंगळलेला दिसला. रिझव्‍‌र्ह बँक आणि सरकार दोघेही या संबंधाने सक्रियपणे पावले टाकत आहेत, असे कांत यांनी सांगितले.

उच्च वृद्धीदर गाठण्यासाठी नेमके नवीन असे काय करावे लागेल, याचा साकल्याने विचार करावा लागेल, असे प्रतिपादन कांत यांनी ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या कार्यक्रमात ‘नावीन्यतेच्या संस्कृतीला चालना’ या विषयावर बोलताना केले.

रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दरात १.१० टक्क्यांची कपात करून भूमिका बजावली, तर केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला प्रोत्साहनाची तीन महत्त्वाची पावले टाकली आणि पुढेही तसे प्रयत्न सुरू राहतील, असे त्यांनी नमूद केले. भारतीय अर्थव्यवस्थेचा मूळ पाया मजबूत आणि अबाधितआहे. अर्थव्यवस्थेला पुन्हा उच्च विकासपथावर आणण्याची आवश्यकता केवळ आहे, असे ते म्हणाले. आगामी काळात टाकल्या जाणाऱ्या पावलांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील अनेक कंपन्यांची निर्गुतवणूक केले जाईल. खाणकाम आणि कोळसा क्षेत्रात आणखी अधिक सुधारणा शक्य असल्याचेही त्यांनी संकेत दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 3:27 am

Web Title: extraordinary steps to deal with economic slowdown niti aayog zws 70
Next Stories
1 अर्थ-उभारीसाठी आणखी घोषणा लवकरच-केंद्र सरकार
2 दोन सत्रांतील घसरणीनंतर निर्देशांकात वाढ
3 बँकप्रमुखांबरोबर अर्थमंत्र्यांची आज बैठक
Just Now!
X