04 June 2020

News Flash

‘फेसबूक’कडून ई-कॉमर्स कंपनी ‘दफाइंड’चे अधिग्रहण

सेशल नेटवर्किंग क्षेत्रातील फेसबूक या प्रमुख कंपनीने ई-कॉमर्स क्षत्रातील सर्च इंजिन 'दफाइंड' कंपनीच्या अधिग्रहणाद्वारे ई-कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे.

| March 16, 2015 02:19 am

सेशल नेटवर्किंग क्षेत्रातील फेसबूक या प्रमुख कंपनीने ई-कॉमर्स क्षत्रातील सर्च इंजिन ‘दफाइंड’ कंपनीच्या अधिग्रहणाद्वारे ई-कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. ‘फेसबूक’ने याद्वारे इंटरनेटवरील कमाई करून देणाऱ्या सर्च आणि ई-कॉमर्स या सर्वात मोठ्या दोन विभागात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे ‘फेसबूक’च्या जाहिरातींच्या माध्यमाचा प्रसंगानुरूप ग्राहकांना जास्त उपयोग होऊ शकतो असे ‘फेसबूक’ने जारी केलेल्या आपल्या संदेशात म्हटले आहे. अशाच प्रकारचा संदेश ‘दफाइंड’द्वारे देखील जारी करण्यात आला असून, आपल्या संदेशात ते म्हणतात, याद्वारे ‘फेसबूक’वर रोज दिसणाऱ्या जाहिरातींना अधिक योग्य आणि प्रसंगानुरूप बनविण्यात येईल. आमचे अनेक कर्मचारी ‘फेसबू’कशी जोडले गेल्याने सोशल नेटवर्किंवरील जाहिरातींमध्ये मोठ्याप्रमाणावर विकास होईल. ‘दफाइंड’ची स्थापना २००६ मध्ये भारतीय मुळाच्या शिव कुमार आणि शक्तिकांत खंडेलवाल यांनी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2015 2:19 am

Web Title: facebook buys shopping search engine thefind
Next Stories
1 आता ‘पीएफ’चा पगारावर जादा भार
2 नफेखोरीने मोठी घसरण
3 रुपयाचीही गटांगळी ६३ च्या वेशीवर
Just Now!
X