News Flash

शहाळ्याचेच पण ‘अरेबियन’.. शीत पेय दाखल

आरोग्यासाठी पोषक खाद्य व पेय उत्पादनांची आघाडीची निर्माता, वितरक व उत्पादक कंपनी असलेल्या ‘फ्लेवर अ‍ॅण्ड लाइफ (एफएएल) फूड अ‍ॅण्ड ...

| August 20, 2015 03:26 am

आरोग्यासाठी पोषक खाद्य व पेय उत्पादनांची आघाडीची निर्माता, वितरक व उत्पादक कंपनी असलेल्या ‘फ्लेवर अ‍ॅण्ड लाइफ (एफएएल) फूड अ‍ॅण्ड बेव्हरेजेस’ने तिची ‘को को जॉय’ ही मुख्य नाममुद्रा भारतीय बाजारपेठेत सादर केली आहे. सौदीतील आंतरराष्ट्रीय उद्योग समूहातील कंपनी असलेल्या या पेयासाठी वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्डस हे यानिमित्ताने उपस्थित होते.
‘एफएएल’ समूहांतर्गत विविध १७ देशांमधील ७५हून अधिक कंपन्या असून एकूण कर्मचारी संख्या जवळपास ५,००० आहे. नारळाचे पाणी असलेले हे पेय येत्या महिन्यापासून देशभरात उपलब्ध होणार आहे. कंपनी येत्या काही महिन्यांत याच नाममुद्रेंतर्गत फळांचा रस, बाटलीबंद पाणी आदी उत्पादनेही भारतात आणेल, अशी माहिती याप्रसंगी बोलताना ‘एफएएल फूड अ‍ॅण्ड बेव्हरेजेस’च्या जागतिक व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम झेनोस यांनी या वेळी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2015 3:26 am

Web Title: fal set to enter indian market with packaged coconut water
Next Stories
1 बँकिंग सेवा-प्रांगणात ‘डिजिटल’ चढाओढ
2 पीएफ खात्यातून रक्कम काढण्याच्या ऑनलाइन सुविधेचा ‘ईपीएफओ’कडून फेरविचार
3 बाजार पुन्हा नरम; प्रमुख निर्देशांकात किरकोळ घसरण
Just Now!
X