News Flash

वेगवान ‘५जी’साठी सज्जता

मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स जिओने येत्या गणेशोत्सवापासून परवडणाऱ्या किमतीतील स्मार्टफोनच्या प्रस्तुतीची योजना जाहीर केली आहे.

जिओपाठोपाठ आता एअरटेल, टाटाची ‘इंटेल’शी सहकार्यातून योजना

नव्या पिढीचे वेगवान दूरसंचार तंत्रज्ञान ‘मेक इन इंडिया’ बनावटीचा साज चढविण्यासाठी प्रसंगी या क्षेत्रातील कट्टर स्पर्धकांना एकत्र यावे लागले आहे. रिलायन्स जिओपाठोपाठ आता भारती एअरटेल व टाटा समूहाने इंटेलबरोबर व्यावसायिक सहकार्य करत ५जी भ्रमणध्वनी तंत्रज्ञानाचा आराखडा मांडला आहे.

मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स जिओने येत्या गणेशोत्सवापासून परवडणाऱ्या किमतीतील स्मार्टफोनच्या प्रस्तुतीची योजना जाहीर केली आहे. त्यासाठी अमेरिकी चिप निर्मिती कंपनी इंटेलचे सहकार्य घेण्यात येत आहे. भारती एअरटेलने ५जी तंत्रज्ञानासाठी इंटेलचे तंत्र व्यासपीठ वापरण्याची योजना बुधवारी जाहीर केली. खुल्या ध्वनिलहरीचे जाळे (ओ-रॅन) त्यासाठी उपयोगात आणले जाणार आहे. भारती एअरटेलने यासाठी इंटेलबरोबर कामही सुरू केले असून काही शहरांमध्ये त्याची चाचणी घेण्यात येत आहे.

या सहकार्याद्वारे एअरटेल इंटेलचे तिसऱ्या पिढीतील ‘झेऑन स्कॅलेबल प्रोसेसर’ तसेच अन्य तंत्र उपकरणेही नजीकच्या कालावधीत सादर करू शकेल. भारतीयांना ५जी तंत्रज्ञानावर आधारित विविध सेवा देण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याचे भारती एअरटेलचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी रणदीप सेखन यांनी सांगितले.

इंटेलच्या ‘ओ-रॅन’ मंचावर टाटा समूहही दाखल होऊ पाहात आहे. जपानच्या डोकोमोच्या साहाय्याने यापूर्वी दूरसंचार क्षेत्रात असलेल्या टाटाने ‘५जी’साठी इंटेल तसेच एअरटेलबरोबर जाण्याचे निश्चित केले आहे. तंत्रज्ञानासाठी टाटा समूहातील ‘टीसीएस’ पुढाकार घेत आहे.

जानेवारी २०२२ चा मुहूर्त

भारतात ‘५जी’ दूरसंचार सेवा जानेवारी २०२२ पासून सुरू होण्याची शक्यता आहे. आयएएमएआय-कंतार क्युब अहवालानुसार, जगातील दुसऱ्या क्रमांकाची इंटरनेट ग्राहकसंख्या (६२ कोटी) असलेल्या भारतात २०२५ पर्यंत नेटकऱ्यांची संख्या ९० कोटी होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 12:15 am

Web Title: faster speed internet 5g jio airter akp 94
Next Stories
1 ‘एम१एक्स्चेंज’कडून छोट्या उद्योगांना ७,०५५ कोटींचे साहाय्य
2 ‘मारुती’चा ग्रामीण भारतात वरचष्मा
3 शिव नाडर ‘एचसीएल’च्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून पायउतार
Just Now!
X