08 April 2020

News Flash

निर्देशांकांची नजर‘फेड’!

व्याजदर वाढीच्या दृष्टीने होत असलेल्या अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हच्या बैठकीवर नजर ठेवून

व्याजदर वाढीच्या दृष्टीने होत असलेल्या अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हच्या बैठकीवर नजर ठेवून जागतिक भांडवली बाजारातील सकारात्मकतेचा कित्ता बुधवारी स्थानिक बाजाराकडूनही गिरवला गेला.
दिवसभरातील तेजीच्या जोरावर व्यवहारात २६ हजारांचा टप्पा गाठणारा मुंबई निर्देशांक- सेन्सेक्स दिवसअखेर २५८.०४ अंश वाढीसह २५,९५३.९७ पर्यंत गेला, तर सत्रात ७,९००चा स्तर स्पर्शणारा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर ७०.०५ अंश भर नोंदवीत ७,८९९.१५ वर पोहोचला.
भारतीय प्रमाणवेळेनुसार, मंगळवार उशिराच्या व्यवहारानंतर अमेरिकेतील भांडवली बाजारात तेजी होती, तर चीनमधील प्रमुख निर्देशांकही बुधवारच्या सत्राची सुरुवात वाढीसह करते झाले.
बुधवारच्या व्यवहाराची सुरुवातच तेजीसह करणाऱ्या सेन्सेक्सने लगेचच २६ हजारांचा स्तर गाठला, तर निफ्टीही ७,९०० पर्यंत पोहोचला. दिवसभरातील तेजीमुळे २६,००६.७५ पर्यंत पोहोचलेला मुंबई निर्देशांक दिवसअखेरही मंगळवारच्या तुलनेत वधारला.
दीडशे अंश घसरणीमुळे मंगळवारी पंधरवडय़ाच्या उच्चांकापासून माघारी फिरलेला सेन्सेक्स पुन्हा एकदा या टप्प्यावर पोहोचला. व्यवहारअखेर एक टक्क्याची त्यातील वाढ ३१ ऑगस्टनंतर वरच्या स्तराला घेऊन गेली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने सत्रात ७,९०० टप्पा गाठल्यानंतर व्यवहारात त्याने ७,९१३.९० पर्यंत मजल मारली.
मुंबई शेअर बाजारातील क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बँक निर्देशांक सर्वाधिक १.४२ टक्क्यांनी वाढला. पाठोपाठ ऊर्जा, आरोग्यनिगा, माहिती व तंत्रज्ञान निर्देशांक उंचावले. सेन्सेक्समध्ये २.४८ टक्क्यांसह भारती एअरटेल वरच्या स्थानावर राहिला. सन फार्मा, अॅक्सिस बँक, वेदांता, हीरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो, विप्रो यांचेही समभाग मूल्य वाढले.
अमेरिकी फेडरल रिझव्र्हच्या दोन दिवसांच्या बैठकीच्या निर्णयावरच भारतातील रिझव्र्ह बँकेच्या महिनाअखेर जाहीर होणाऱ्या द्वैमासिक पतधोरणात व्याजदर बदलाबाबत पाऊल उचलले जाणार आहे. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत देशाचा औद्योगिक उत्पादन दर ७ टक्क्यांवरच राहिल्याने तसेच ऑगस्टमधील घाऊक तसेच किरकोळ महागाई दर कमी झाल्याने दर कपातीची आशा उंचावली आहे. यावरच बाजारातील पुढचे व्यवहार प्रतिक्रिया नोंदवतील, अशी शक्यता आहे. बाजारात गणेश चतुर्थीनिमित्ताने गुरुवारी व्यवहार होणार नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2015 7:56 am

Web Title: federal bank positive effect on indian share market
टॅग Bse,Business News,Nse
Next Stories
1 १० लघु-वित्त बँकांना रिझव्र्ह बँकेची प्राथमिक मंजुरी
2 भविष्य निर्वाह निधी खात्यांना फोन सेवेची जोड
3 मुंबईत तीन दिवसांचे ‘ट्रॅव्हल मार्ट’ आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन
Just Now!
X