26 September 2020

News Flash

होईल हो फेरारीची सवारी!

वाहनरसिकांना मोहिनी घालणारी नाममुद्रा असलेल्या फेरारी या आलिशान इटालियन मोटार कंपनीचा भारतीय वाहन बाजारपेठेत पुनर्प्रवेश झाला आहे.

| August 27, 2015 06:19 am

वाहनरसिकांना मोहिनी घालणारी नाममुद्रा असलेल्या फेरारी या आलिशान इटालियन मोटार कंपनीचा भारतीय वाहन बाजारपेठेत पुनर्प्रवेश झाला आहे. कंपनीने कॅलिफोर्निया टी ही कार बुधवारी मुंबईत सादर केली. नवनीत मोटर्सचे प्रमुख शरद कचालिया हे या वेळी उपस्थित होते.
कारची किंमत ३.४५ कोटी रुपये आहे. ३.९ लिटर ट्विन टबरे व्ही ८ इंजिन असलेल्या या कारची क्षमता ३,८५५ सीसी आहे. महागडय़ा ५० हून अधिक फेरारी कार सध्या भारतातील रस्त्यावर धावत आहेत.
२०११ मध्ये श्रेयस समूहाबरोबरच्या भागीदारीमुळे ५०च्या दशकातील फेरारीच्या कार भारतात उपलब्ध झाल्या होत्या. कंपनीने आता नवनीत मोटर्ससह कार विक्री भागीदारी केली आहे. फेरारीचे नवे दालन ऑक्टोबरमध्ये वांद्रे-कुर्ला येथे सुरू होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2015 6:19 am

Web Title: ferrari returns to india with launches ferrari california
Next Stories
1 चढ-उताराचे हेलकावे घेत अखेर बाजार सावरला!
2 चिनी बाजारात पडझड सुरूच, दुसऱ्या दिवशीही ८ टक्क्यांपर्यंत घसरण
3 ऑनलाइन उधारीच्या व्यवहारांसाठी लवकर नियामक चौकट : रिझव्‍‌र्ह बँक
Just Now!
X