29 May 2020

News Flash

जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये पाचवी गुंतवणूक फेरी

जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये विदेशी गुंतवणूकदारांची एकू ण ७८,५६२ कोटी रुपयांची निधीपेरणी झाली आहे.

 

रिलायन्स समूहाच्या जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये विदेशी गुंतवणूकदारांचे स्वारस्य वाढतच चालले आहे. आघाडीची अमेरिकी गुंतवणूक कंपनी के के आरने समूहाच्या तंत्रस्नेही मंचाचा २.३२ टक्के हिस्सा खरेदी करताना ११,३६७ कोटी रुपये मोजले आहेत.

रिलायन्स समूहाच्या जिओ प्लॅटफॉर्म्समधील ही गेल्या महिन्याभरातील पाचवी विदेशी गुंतवणूक तसेच हिस्सा विक्री आहे. जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये विदेशी गुंतवणूकदारांची एकू ण ७८,५६२ कोटी रुपयांची निधीपेरणी झाली आहे.

रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून के के आरची आशियातील सर्वात मोठी गुंतवणूक झाली आहे. समभाग मूल्याबाबत ४.९१ लाख कोटी रुपये तर आस्थापना मूल्याबाबत हा व्यवहार ५.१६ लाख कोटी रुपयांमधील आहे.

जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये फेसबुकने ९.९ टक्के  हिस्सा ४३,५७४ कोटी रुपयांना, सिल्व्हर लेकने १.१५ टक्के   हिस्सा ५,६६५.७५ कोटी रुपयांना तर व्हिस्टा इक्विटी पार्टनर्सने २.३२ टक्केहिस्सा ११,३६७ कोटी रुपयांना ८ मे रोजी खरेदी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 3:05 am

Web Title: fifth investment round in jio platforms abn 97
Next Stories
1 गुंतवणूकदार नाराज; सेन्सेक्स, निफ्टीत घसरण
2 Bad News: अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर शून्याखाली जाणार – रिझर्व्ह बँक
3 महिनाभरात जिओचं पाचवं मोठं डील; अमेरिकन कंपनी करणार ११ हजार ३६५ कोटींची गुंतवणूक
Just Now!
X