News Flash

PMC बँक प्रकरण : रिझर्व्ह बँकेचा निर्णय बँक आणि ग्राहकांच्या फायद्यासाठी – अनुराग ठाकुर

सरकारकडून आयकर मर्यादेत सूट देण्याचे संकेत

अनुराग ठाकुर

रिझर्व्ह बँक आपलं काम योग्यरितीने करत असल्याचं मत अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी व्यक्त केलं. गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांना पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव बँकेवर घालण्यात आलेल्या निर्बधांवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.

“सर्व पर्यायांवर विचार केल्यानंतर बँक आणि ग्राहक दोघांनाही फायदा होईल या दृष्टीने रिझर्व्ह बँकेकडून पीएमसी बँकेवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला असावा,” असं ठाकुर यावेळी म्हणाले. रिझर्व्ह बँकेने मंगळवारी पीएमसी बँकेवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला होता. रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेतील खातेदारांना सहा महिन्यांसाठी 1 हजार रूपये काढण्याची मुभा दिली होती. परंतु गुरूवारी ती वाढवून 10 हजार रूपये करण्यात आली. याव्यतिरिक्त बँकेद्वारे नवे कर्ज देण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

यावेळी त्यांनी पंजाब नॅशनल बँकेवरही भाष्य केलं. अँटिग्वाच्या पंतप्रधानांनी दिलेलं मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणावर भारताला दिलेलं आश्वासन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या प्रयत्नांचंच फळ असल्याचे ते म्हणाले.

सरकारकडून आयकरात सूट देण्याचे संकेत
“योग्य वेळ आल्यावर करपात्र उत्पन्नाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात येईल,” अशी माहिती अनुराग ठाकुर यांनी दिली. गेल्या आठवड्यात कॉर्पोरेट कराच्या दरात कपात करण्यात आली असून तो 30 टक्क्यांवर 22 टक्के करण्यात आला आहे. त्यानंतर अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी मागणी आणि पुरवठा वाढावा करपात्र उत्पन्नाची मर्यादा मर्यादा वाढवण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली होती.

जेव्हा करपात्र उत्पन्नाची मर्यादा वाढवण्याची वेळ येईल, त्यावेळी सरकार यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असं ठाकुर यावेळी म्हणाले. यापूर्वी सरकारने करपात्र उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखांवरून वाढवून 5 लाख करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. पुढील काळात वेळ आल्यास याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 3:38 pm

Web Title: finance minister state anurag thakur rbi decision pmc bank taken for benifit of bank and customers jud 87
Next Stories
1 ‘कभी ऑनलाइन हॉटेल सर्च किया हैं?’ विचारणाऱ्या ‘त्रिवागो’वाल्याने सोडली कंपनी, आता ‘या’ कंपनीत करणार काम
2 आता ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार इन्कम टॅक्स
3 ‘पीएमसी’तून १० हजार काढण्याची मुभा
Just Now!
X